Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- भाजप आणि शिवसेनेत योजनापूर्वक दुरावा निर्माण केला गेला.
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं अत्यंत महत्त्वाचं विधान.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वपक्षाचे नुकसान करत आहेत.
वाचा:… म्हणून नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजर झाले नाहीत
‘भाजप आणि शिवसेनेत २०१९ मध्ये योजनापूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि आता पुन्हा नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यानही तेच करण्यात आले. हे खुर्चीचा मोह असलेल्या उद्धव ठाकरे यांना कळत नाही. मंदिरांचा विषयही असाच आहे. मंदिरे उघडलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चालणार नाहीत. त्यांना ते चालणार नाही म्हटल्यावर खुर्ची टिकवायची आहे म्हणून मंदिरे उघडणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली. नाहीतर मंदिरे न उघडण्याचे दुसरे काही कारणच नाही’, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. असे खुर्चीवर प्रेम असणारे उद्धव ठाकरे हे स्वपक्षाचेच नुकसान करत आहेत, असेही पाटील पुढे म्हणाले.
वाचा:मुख्यमंत्र्यांसमोरच प्रताप सरनाईक म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण…
चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ‘मला एका प्रश्नाचे उत्तर द्या की, संजय राऊत यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेतून कुणी बोलताना दिसतंय का हो? आमचे परममित्र दिवाकर रावते कुठे गेले. आमचे अतिपरममित्र रामदास कदम कुठे आहेत. अनिल देसाई, सुभाष देसाई कुठे गेलेत. रवी वायकर का बोलत नाहीत. कुठे गेलेत सगळेजण. एकटे संजय राऊतच बोलतात. एकतर बाकीचे बोलले तर खरे बोलतील म्हणून त्यांना बोलू दिलं जात नाही किंवा ते नाराज असतील म्हणून बोलत नसतील. काय याला बोलायचं ते बोलू दे खूप नुकसान करतोय म्हणून ते गप्प राहत असतील’, अशी टोलेबाजी पाटील यांनी केली. ‘शिवसेनेचे कार्यकर्ते खेचून नेले जात आहेत. त्या खेडमध्ये अख्खी पंचायत समिती राष्ट्रवादीने पळवून नेली. हे काहीच करू शकले नाहीत. संजय राऊत तिथे आले, अगदी त्यांच्या स्टाइलमध्ये… त्यांच्या स्टाइलचं मला तर बाबा फारच कौतुक वाटतं! स्टाइलमध्ये येऊन म्हणाले, काही होऊ देणार नाही आणि व्हायचं ते झालंच. तिथे शेवटी राष्ट्रवादीचाच पंचायत समितीचा सभापती झाला’, अशा शब्दांत पाटील यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.
वाचा:परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले ५० हजार रुपये; कारण…