Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या कार्यकक्षेत येणार्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट ४ मधील विभाग्स्तरीत पदे भरतीद्वारे ०३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. “विदित सहाय्यक” या पदावर सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षांच्या कंत्राटी कालावधीसमाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर सदर उमेदवारला ‘तंत्रज्ञ’ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
२९ डिसेंबर २०२३ रोजी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून भरतीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, अर्जाच्या शेवटच्या तारखेची घोषणा लवकर केली जानर आहे. ‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित भरती २०२४’ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…
पदाचे नाव आणि पदसंख्या:
विद्युत सहाय्यक : ५३४७ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल यांचे १०+२ बंधामधील शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
किंवा
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिक सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमापत्र किंवा महाराष्ट्र राजी व्यवसाय परीक्षा मंडल यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
वयोमर्यादा :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान १८ वर्षे ते कमाल २७ वर्षे असणे आवश्यक आहे.
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत.
मिळणार एवढा पगार :
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात देण्यात येईल.
- प्रथम वर्ष : एकूण मानधन १५,००० रुपये
- द्वितीय वर्ष : एकूण मानधन १६,००० रुपये
- तृतीय वर्ष : एकूण मानधन १७,००० रुपये
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज स्वीकृती करण्याची लिंक संस्थेच्या जानेवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून, यासोबत ऑनलाइन अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या केल्या जातील.
तर, निवड प्रक्रियेसाठी ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च २०२४ पार पडेल.
अधिक माहितीसाठी आणि महत्त्वाच्या तारखांच्या पुढील महितीसाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन वेळोवेळी Notification तपासणे अनिवारी आहे.
महत्वाचे :महावितरण भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.