Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लग्नाच्या स्वागत समारंभावरुन परताना अनर्थ, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, चार जणांचा मृत्यू

10

अमरावती : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघातात सातत्याने वाढ होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच रात्री दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात १ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास चांदूरबाजार-अमरावती मार्गावरील एका बारसमोर घडला. नववर्षाची पहिली रात्र त्या चौघांसाठी काळरात्र ठरली.

सौरभ किशोर मसराम (२२) रा. मासोद, अमरावती, शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान (२१) ताजनगर, चांदूरबाजार, गोलू उर्फ धीरज राजू टवलारे (२०) शेवती, नांदगाव पेठ व शेख नसीम शेख हसन (४०) रा. पिंपळपुरा, चांदूरबाजार अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात शेख नजीर शेख हसन (५५) रा. ताजनगर, चांदूरबाजार व ओम रवींद्र मसराम (२०) रा. मासोद, अमरावती हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ मसराम हा दुचाकी क्रमांक एमएच २७ बीजे ४१५४ ने आपल्या दोन सहकाऱ्यांसह बहिरमवरुन अमरावती मार्गाने मासोद येथे जात होता.

कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार असू शकतो, सतेज पाटील काय म्हणाले?
शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान हे दुचाकी क्रमांक एमएच २७ डीजी ९७०१ ने आपल्या दोन सहकाऱ्यांसह लग्नाच्या स्वागत सभारंभातून अमरावतीवरुन चांदूरबाजारकडे येत होते. चांदूरबाजारवरुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बारसमोर दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सौरभसह त्यांच्या दुचाकीवरील गोलू आणि शेख जुनेदसह त्यांच्या दुचाकीवरील शेख नसीम यांचा जागीच मृत्यू झाला. तर सौरभ यांच्या दुचाकीवरील रवींद्र व शेख जुनेद यांच्या दुचाकीवरील शेख नजीर हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चांदूरबाजारचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगीरे घटनास्थळावर पोहोचले.
अंबिका मसाला जगभर पोहोचविणाऱ्या कमल परदेशी काळाच्या पडद्याआड
त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ व प्रमोद राऊत, सारिका राऊत, विनोद इंगळे, दिलीप मुळे, विजय आगळे, प्रशांत निंभोरकर, आशिष इंगळे, गौरव पुसदकर करीत आहेत.
लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचा ‘राम कदम’ पॅटर्न; घाटकोपरचा सुपरहिट फॉर्म्युला देशभरात वापरणार
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.