Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रागाच्या भरात आयुष्याची दोर कापली, डॉक्टर ठरले देवदूत, मृत्यूच्या दाढेतून तरुणाला आणलं परत

9

इंदापूर : डॉक्टरांना पृथ्वीवरील देव म्हटले जाते…याचा अनुभव इंदापूर तालुक्यातील एका कुंटूबाने घेतला. लासुर्णे (ता.इंदापूर) येथील देसाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. बाबासाहेब कांबळे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागरला (नाव बदलले आहे) मृत्यूच्या दारातून परत आणले.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका कुंटुबामध्ये गेल्या महिन्यात दुपारी तीनच्या सुमारास पती-पत्नीमध्ये भांडण सुरु होते. भांडणामध्ये ३० वर्षांच्या सागरने अचानक दुपट्याच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुंटुबातील सदस्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दरवाजा तोडून दुप्पटा कापून सागरला खाली उतरवलं. त्याची छाती दाबून प्राथमिक उपचार सुरु केले. त्याचे हातपाय चोळून त्याला १५ मिनिटांमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वी सागरचा रक्तदाब मशिनवरती शून्य दाखवत होता. तसेच हृदयाचे ठोके खूपच मंदावले होते. तो बेशुद्ध (कोमामध्ये) होता.

डॉ. बाबासाहेब कांबळे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी तातडीने जीवनरक्षक उपचार सुरु केले. छाती दाबून हृदय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कृत्रीम प्राणवायू दिला. पहिले २४ तास सागरने उपचाराला कोणताही प्रतिसाद दिला नाही. हळूहळू दुसऱ्या दिवसापासून हृदयाचे ठोके वाढण्यास सुरवात झाली.

‘तुला जिवंत सोडत नाही’, चावी फेकली म्हणून पुतण्याचं संतापजनक कृत्य, नेमकं काय घडलं?
तिसऱ्या दिवशी रक्तदाब मशीनवर दिसू लागला. चौथ्या दिवशी सागरने डोळे उघडले. पाचव्या दिवसापासून त्याने श्‍वास घेण्यास सुरवात केली. सहाव्या दिवशी कृत्रिम श्‍वास देणारी मशिन बंद करण्यात आली. दहाव्या दिवशी त्याला घरी सोडण्यात आले होते. दहा दिवसामध्ये डॉ. बाबासाहेब कांबळे, डॉ.ज्योतिराम देसाई, डॉ. पूनम देसाई, डॉ. शशिकांत भोसले, डॉ. प्रतिक बुजुरगे यांच्या अथक प्रयत्नामुळे सागरचा जीव वाचला. सागरच्या कुंटुबाने सागरला मृत्यूच्या दारातून परत आणल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले.

रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला चारचाकी धडकली पाचजण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
रागावरती नियंत्रण असणे गरजेचे …

यासंदर्भात एम. डी. मेडिसिन हृदय रोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी सांगितले की, प्रत्येकाने रागावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. रागामध्ये घेतलेले निर्णय चुकू शकतात. सागरवर गोल्डन अव्वरमध्ये उपचार झाल्यामुळे तसेच नशिबाने साथ दिल्यामुळे सागरचे प्राण वाचवण्यात यश आले.

छ. संभाजीनगरमध्ये हातमोजे बनवणाऱ्या कंपनीत अग्नितांडव, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

एखाद्या व्यक्तिीने गळ्याला फास लागल्यामुळे त्याच्या मेंदुकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यावरती दाब पडून काम बंद होते. मेंदूचे काम पडण्यास सुरवात झाल्याने व्यक्ती कोमामध्ये जातो. तसेच मानेच्या मणक्याचे हाड तुटून मेंदूचे श्‍वासयंत्र बंद पडून व्यक्तीचा मृत्यू होतो. गळफास घेतल्यानंतर व्यक्ती दगावण्याची जास्त शक्यता असल्याचे डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.