Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त ५,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला जबरदस्त स्मार्टफोन; कमी किंमतीतही 8GB RAM ची ताकद

10

टेक्नोनं आज भारतीय बाजारात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन Tecno POP 8 लाँच केला आहे. हा लो बजेट मोबाइल बँक फक्त ५,९९९ रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल, ह्यासाठी ऑफर्सचा वापर करावा लागेल. इतक्या कमी किंमतीत देखील ह्यात 8GB RAM म्हणजे 4GB फिजिकल आणि 4GB वर्चुअल रॅम मिळतो. चला जाणून घेऊया नव्या टेक्नो पॉप ८ची संपूर्ण माहिती.

Tecno POP 8 ची किंमत

टेक्नो पॉप ८ स्मार्टफोन सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. ह्यात ४जीबी रॅम + ६४जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. Tecno POP 8 ची किंमत ६,४९९ रुपये आहे जो येत्या ९ जानेवारी पासून देशात उपलब्ध होईल. बँक ऑफर अंतगर्त कंपनी ह्यावर ५०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे त्यामुळे फोनची किंमत ५,९९९ रुपये होईल. टेक्नो पॉप ८ को Mystery White, Alpenglow Gold, Magic Skin आणि Gravity Black कलरमध्ये अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.

Tecno POP 8 चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो पॉप ८ स्मार्टफोनमध्ये ७२० x १६१२ पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.६ इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल स्टाइल असलेली ही एलसीडी स्क्रीन ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. Tecno POP 8 ची जाडी फक्त ८.७५मिमी आहे. या फोनमध्ये १००% Recyclable Back Cover चा वापर करण्यात आला आहे.

Tecno POP 8 मध्ये यूनिसोक टी६०६ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. टेक्नो पॉप ८ मध्ये Memory Fusion टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ही टेक्नॉलॉजी फोनच्या ४जीबी फिजिकल रॅममध्ये एक्स्ट्रा ४जीबी वचुर्अल रॅम जोडते आणि एकूण ८जीबी रॅमची ताकद देते. तर एसडी कार्डच्या मदतीनं स्टोरेज देखील १टीबी पर्यंत वाढवता येते. फोन अँड्रॉइड १३ ‘गो’ एडिशन वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Tecno POP 8 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेसर तसेच सेकंडरी एआय लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन ड्युअल एलइडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी हा टेक्नो फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी वेगानं करण्यासाठी मोबाइलमध्ये १०वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड फ्रेमवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये Double dts Speakers देण्यात आले आहेत. ह्यात FM Radio तसेच OTG सारखे पर्याय देखील आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.