Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वर्षाअखेरीस प्रभासच्या ‘सालार ची गाडी सुसाट, जगभरात ६०० कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री

6

मुंबई– २०२३ हे वर्ष दोन भारतीय स्टार्ससाठी जबरदस्त ठरले आहे. शाहरुख खानने ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटातून ब्लॉकबस्टर पुनरागम केले केले, तर दुसरीकडे २०१७ पासून हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रभासने ‘सालार’मधून बंपर कमबॅक केली. ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’च्या अपयशानंतर त्याच्या सालार या नव्या सिनेमाने मात्र बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

उत्साहाच्या भरात प्रभासच्या गालावर चाहतीनं मारली चापटी

‘सालार’ने १० दिवसांत जगभरात ६०० कोटी रुपयांची कमाई केली असतानाच, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ३५० कोटी रुपयांची कमाईही पार करेल असा अंदाज बांधला जात आहे. शुक्रवारी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १० कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई केली होती, पण आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने पुन्हा वेग पकडला . २१ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या ‘सालार’ने शुक्रवारच्या तुलनेत रविवारी ५०% पेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनीही ‘केजीएफ’ फ्रँचायझीला मिळालेले यश हा योगायोग नव्हता हे सिद्ध केले आहे. प्रशांत यांना सध्या देशातील अॅक्शनवर आधारीत सिनेमांच्या सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानले जाते. ‘सालार’ ने त्याच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये एका दिवसापूर्वी शनिवारी देशात १२.५५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते, तर सॅकनिल्कच्या मते, रविवारी, २०२३च्या शेवटच्या दिवशी, १४.५० रुपयांचे कलेक्शन केले आहे. दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी त्याची कमाई ९.६2 कोटी रुपये होती. आता १० दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘सालार’चे एकूण कलेक्शन ३४४.६७ कोटी रुपयांवर पोहचले आहे.
‘तू माझ्यासाठी सर्वकाही ठीक करशील…’, सरत्या वर्षाला निरोप देताना तेजश्री प्रधान आईच्या आठवणीत भावूक
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमुळे संध्याकाळी कमी प्रेक्षक

२०२३ मधली बॉक्स ऑफिसवर मोठी लढत प्रभासच्या सालार आणि शाहरुख खानच्या डंकीत होती. यात सालार यशस्वी झाला. ‘सालार’ला ‘डंकी’च्या तुलनेत उत्तर भारतात खूपच कमी शो मिळाले, तरीही या चित्रपटाने हिंदींमध्ये १० दिवसांत ११2 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. रविवारी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या ३९.८८% होती.
३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमुळे, संध्याकाळी आणि रात्रीच्या शों ना प्रेक्षकांची संख्या कमी होती. त्याचा प्रभाव २०२०४ च्या पहिल्या दिवशीही राहू शकतो, कारण प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग कुटुंब आणि मित्रांसह नवीन वर्षाचे स्वागत करण्यात व्यस्त आहे.
दोन महिने कठीण काळ, एकामागून एक आजारांशी झुंज, अमृता खानविलकर म्हणते, खूप थकवा अन्…
‘सालार’चे जगभरातील कलेक्शन

‘सालार’ ने ३१ डिसेंबर रोजी जगभरातील कलेक्शनमध्ये एक नवा टप्पा गाठला आहे. शनिवारी या चित्रपटाने जागतिक रित्या २१.४५ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर रविवारी या चित्रपटाने जगभरात २३ कोटी रुपयांची कमाई केली होती. अशाप्रकारे १० दिवसांत या चित्रपटाने जगभरात ६०१ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. ‘सालार’चे बजेट ४०० कोटी रुपये होते. त्यामुळे ब्लॉकबस्टरचा टॅग मिळवण्यासाठी चित्रपटाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. प्रभासशिवाय या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, श्रुती हासन आणि श्रिया रेड्डी यांच्याही भूमिका आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.