Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आयसीएसएसआरमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज करण्याची पध्दत
या दिवशी करता येणार अर्ज :
Indian Council of Social Science Research (ICSSR) च्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ४ जानेवारी २०२४ पासून सुरू होईल, ही अर्ज प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहील.
या पदांवर भरती :
ICSSR मध्ये एकूण ३५ जागा आहेत. यामध्ये सहाय्यक संचालकाच्या ८, संशोधन सहाय्यक १४ आणि निम्न विभाग लिपिकाच्या १३ पदांवर भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
लोअर डिव्हिजन क्लर्क : अर्जदारांनी उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांचा टायपिंगचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट असावा.
संशोधन सहाय्यक : उमेदवारांना किमान ५०% गुणांसह कोणत्याही सामाजिक विज्ञान विषयात एमए पदवी असणे आवश्यक आहे.
सहाय्यक संचालक (संशोधन) : उमेदवारांकडे कोणत्याही सामाजिक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता असावी.
वयोमर्यादा:
लोअर डिव्हिजन क्लर्क आणि संशोधन सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. सहाय्यक संचालक (संशोधन) या पदासाठी कमाल वय ४० वर्षे आहे.
मिळेल एवढा पगार :
- लोअर डिव्हिजन क्लर्क : १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये
- संशोधन सहाय्यक : ३५ हजार ४०० ते १ लाख २३ हजार ४०० रुपये
- सहाय्यक संचालक (संशोधन) : ५६ हजार रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये
या भरतीसाठी असा करा अर्ज :
- सर्वप्रथम ICSSR च्या अधिकृत वेबसाइट icssr.org वर जा.
- यानंतर Career / Job विभागात जा.
- आता अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
- यानंतर, अचूक तपशीलांसह अर्ज पूर्णपणे भरा.
- लागू असल्यास, अर्ज फी भरण्याचा पर्याय निवडा.
- पुढील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.