Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एसबीआय लिपिक भरतीसाठी ५ जानेवारीपासून सुरू होणार परीक्षा; जाणून घ्या सविस्तर माहिती

7

SBI Clerk Prelims Exam 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक (Junior Associate) भरती पूर्व परीक्षा २०२३ परीक्षा एसबीआयच्या वतीने ५, ६, ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले गेले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून आपआपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

या परीक्षेत सहभागी होणार्‍या उमेदवारांनी परीक्षेसाठी विहित केलेल्या काही मार्गदर्शक तत्त्वांची आणि महत्त्वाच्या नियमांची माहिती तपासणे आवश्यक आहे. यामुळे परीक्षेच्या दिवशी येणाऱ्या अडचणी आणि परीक्षेपासून वंचित राहणे टाळता येईल.

SBI CBO Recruitment 2023 : एसबीआयमध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर पद भरती; तीन टप्प्यात पार पडणार निवड प्रक्रिया

प्रवेशपत्र, वैध ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र बाळगणे अनिवार्य आहे :
SBI लिपिक प्रीलिम परीक्षेला बसणार असलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यांपैकी एक परीक्षा केंद्रात सोबत नेले आवश्यक आहे. कारण, ओळखपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. शिवाय, अशा उमेदवारांना परीक्षा देण्यास मनाई केली जाऊ शकते.

यासोबतच उमेदवाराने परीक्षा केंद्रावर अर्ज भरताना त्याने अपलोड केलेल्या छायाचित्राच्या किमान ८ प्रती सोबत घ्याव्यात, जेणेकरून त्याला त्याच्या पडताळणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.

वेळेकडे विशेष लक्ष द्या :

उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेच्या किमान एक तास आधी त्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारे उशिरा येण्यास केंद्र जबाबदार राहणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी वेळेची विशेष काळजी घ्यावी.

उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक गॅझेट केंद्रावर नेण्यास परवानगी दिली जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी मोबाईल, स्मार्ट घड्याळ इत्यादी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत घेऊ नये.

अशी असेल परीक्षा :

एसबीआय लिपिक प्रीलिम परीक्षेत उमेदवारांकडून एकूण १०० बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिलेला आहे. प्रश्नपत्रिकेत इंग्रजी भाषेतून ३० प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे ३५ प्रश्न आणि तर्क क्षमता विषयातून ३५ प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उमेदवारांना ६० मिनिटे म्हणजेच १ तासाचा अवधी देण्यात आल आहे.

Bank of India Recruitment 2024 : १०वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी; बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.