Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Meta नं बॅन केले ७१ लाखांपेक्षा जास्त भारतीय WhatsApp अकाऊंट; आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

7

Meta नं पुन्हा एकदा भारतात अनेक WhatsApp अकाऊंट्स बॅन केले आहेत. फक्त व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर कंपनीनं लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्म Instagram वरून ४७ लाखांपेक्षा जास्त चुकीचा कंटेंट आणि Facebook वरून १८३ लाखांपेक्षा जास्त पोस्ट काढून टाकल्या आहेत. IT Rules 2021 नुसार कंपनी दर महिन्याला लाखो व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स बॅन करते. तसेच, फेसबुक आणि इंस्टग्रामवरील चुकीचा कंटेंट हटवते. Meta नुसार, कंपनीनं ७१ लाखांपेक्षा जास्त भारतीय व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बॅन केले आहेत.

Meta नं बॅन केले इतके व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट

१-३० नोव्हेंबर दरम्यान Meta नं ७१,९६,००० व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येक महिन्याला रिपोर्ट देत असतं. कंपनीनं आपल्या मंथली कंप्लायन्स रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की युजर्सच्या कोणत्याही रिपोर्टपूर्वीच ह्यातील जवळपास १९,५४,००० अकाऊंट प्रोअ‍ॅक्टिव्हली बॅन करण्यात आले होते. दरम्यान WhatsApp ला एकूण ८,८४१ तक्रारी मिळाल्या. ह्यातील ४,६१३ बॅन संबंधित तक्रारी होत्या, तर २,०६८ अर्ज अकाऊंट सपोर्ट संबंधित होते आणि १,४१२ इतर तक्रारी होत्या.

Instagram आणि Facebook वरील पोस्ट हटवल्या

Instagram आणि फेसबुक पाहता मेटानं नोव्हेंबर, २०२३ मध्ये देशात फेसबुकच्या पॉलिसीनुसार, १८३ लाखांपेक्षा जास्त पोस्ट हटवल्या. तसेच, फोटो-शेयरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामवर पॉलिसीनुसार ४७ लाखांपेक्षा जास्त कंटेंट हटवला आहे. Facebook ला भारतीय कम्प्लेंट सिस्टममधून २१,१४९ रिपोर्ट्स मिळाले होते. त्यातील १०,७१० प्रकरणं सोडवण्यात आली. ह्या तक्रारींमध्ये नियमांचे उलंघन आणि डेटा डाउनलोड करणे, हॅकिंग आणि इतर काही गोष्टींचा समावेश होता.

मेटाच्या मासिक रिपोर्टनुसार इतर १०,७३९ रिपोर्ट्स देखील रिव्यू करण्यात आले. त्यातील ४,५३८ रिपोर्ट्सवर कारवाई झाली. इतर ६,२०१ रिपोर्ट्सची देखील समीक्षा करण्यात आली, परंतु ह्यावर कारवाई करण्यात आली नाही. फोटो-शेयरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामवर ११,१३८ रिपोर्ट आले. ह्यातील ४,२०९ प्रकरणात युजर्सना उत्तर देण्यात आलं. तर ६,९२९ रिपोर्ट्सचा स्पेशल रिव्यू झाला, त्यातील ४,१०७ रिपोर्ट्सवर कारवाई करण्यात आली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.