Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Work From Home Jobs : या ५ वेबसाइटवरून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा; ‘वर्क-फ्रॉम-होम’ शोधणार्यांसाठी उत्तम संधी
1. WORKING NOMADS
वर्किंग नोमॅड्स अनेक कंपन्या आणि संस्थांना २०१४ पासून त्यांच्या दूरस्थ कामासाठी उमेदवार शोधण्यात मदत करतात. नोमॅड्स करिअर्स जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देतात. WORKING NOMADS ही युजर्सची अतिशय आवडती वेबसाइट मानली जाते, जी घरून काम करणाऱ्यांसाठी नोकऱ्या शोधण्यात मदत करते. या वेबसाइटवर अनेक प्रकारच्या पोस्टसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ज्यात लेखन, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजर, प्रॉडक्ट इंजिनीअर, ग्राफिक डिझाइन आणि अनेक नोकरीच्या संधीं या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
WORKING NOMADS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथ क्लिक करा.
2. REMOTE OK
रिमोट ओके चा वापर जगभरातील लाखो लोक रिमोट वर्कच्या नोकऱ्या शोधण्यासाठी करतात. Amazon, Microsoft, Strike आणि YC यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी शोधणार्या अनेकांसाठी Remote Ok वेबसाइट वरदान ठरत आहे. रिमोट ओके ही Online आणि Remote नोकर्या पुरवणारी वेबसाइट आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही Remoate Work शोधण्याचे काम सोप्पे करतात. या वेबसाइटवर व्यवस्थापन, ऑडिटर, व्यवसाय विकास व्यवस्थापक आणि तांत्रिक आघाडीसह विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
REMOTE OK च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
3. JUST REMOTE.COM
एका क्लिकच्या मदतीने तुम्हाला जगभरातील कोणाशीही जोडणारे ईमेल, चॅट आणि व्हिडिओ कॉलच्या मदतीने विविध लोकांशी जोडण्यास मदत करतात. JUST REMOTE.COM प्रत्येकाला त्यांच्या आवडीची नोकरी शोधण्यात मदत करते आणि त्यांना कुठूनही काम करण्याची मुभा देते. JUST REMOTE.COM ही एक वेबसाइट आहे जी घर बसल्या नोकरी शोधण्यात मदत करते. या वेबसाइटवर अनेक प्रकारच्या पोस्टसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात, ज्यामध्ये बॅकएंड इंजिनीअर, लेखक, व्यवस्थापक आणि मार्केटिंग प्रोग्राम स्पेशलिस्ट यासारख्या पदांचा समावेश आहे.
JUST REMOTE.COM च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
4. JOBGETHER
JOBGETHER एक वेबसाइट आहे जी तुम्हाला घरबसल्या नोकरी शोधण्यात मदत करते. या वेबसाइटवर विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये जोखीम व्यवस्थापक (Risk Management), डेटा विश्लेषक (Data Analyst) आणि उत्पादन व्यवस्थापक (Production Manager) यांसारख्या पदांचा समावेश आहे.
JOBGETHER च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
5. WEWERKERREMOTE
WEWORKERREMOTE ही एक वेबसाइट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही विविध ठिकाणच्या नोकर्या शोधण्यात मदत करतात. या वेबसाइटवर या पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, ज्यात तांत्रिक लीड, असिस्टंट मॅनेजर आणि सर्व्हिस किंवा जनरल मॅनेजर यासारख्या पदांचा समावेश आहे.
WEWORKERREMOTE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.