Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुण्याचा प्रगत संगणन विकास केंद्र येथे विविध पदांची भरती सुरु; कोणत्याही अर्ज शुल्काशिवाय करा ऑनलाइन अर्ज
C-DAC: Centre for Development of Advanced Computing मधील या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले जाणार नसून, उमेदवारांना ८ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदभरतीचा तपशील :
संस्था : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (C-DAC, Pune)
पद संख्या : १८ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
मुलाखतीचे ठिकाण :
ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहHuman Resource Department Centre for Development of Advanced Computing Innovation Park, 34, B/1, Panchavati Road, Pune – 411 008.
या पत्त्यावर मुलाखतीसाठी ०२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहायचे आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारचे इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, फिजिक्स / संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
- पदवीधर / क्वांटम ऑप्टिक्स किंवा क्वांटम कम्युनिकेशनमध्ये पीएच.डी / क्वांटम फिजिक्समध्ये पीएच.डी / बी.ई./बी. टेक./ एम.ई/एम.टेक./ एमसीए / इंग्रजी/मास कम्युनिकेशनमधील प्रथम श्रेणी ६०%
- पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी / पीएच.डी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / एम.ए./ विज्ञानातील कोणताही पदवीधर
(सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहीरात वाचावी.)
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत, ऑफलाइन / पोस्टाने किंवा कुरिअरने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील अपलोड करायती आहेत.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार Centre for Development of Advanced Computing कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स :
Centre for Development of Advanced Computing भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.