Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयबीपीएस अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार निवड

7

IBPS Recruitment 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, मुंबई (Institute Of Banking Personnel Selection, Mumbai) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून आयबीपीएसमधील विविध पदे भरली जाणार आहेत. सदर भरतीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात येणार आहेत. या मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ०२ आणि ०४ जानेवारी २०२४ रोजी होणार आहेत.

पदभरतीचा तपशील :

संस्था : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, मुंबई ((Institute Of Banking Personnel Selection, Mumbai)

भरले जाणारे पद :

  • विश्लेषक प्रोग्रामर – पायथन (Analyst Programmer-Python)
  • विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net (Analyst Programmer-ASP.Net)
  • आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrator)
  • प्रोग्रामिंग सहाय्यक (Programming Assistant)

नोकरीचे ठिकाण : मुंबई

निवड प्रक्रिया :
मुलाखत

मुलाखतीची तारीख : ०२ आणि ०४ जानेवारी २०२४

मुलाखतीचा पत्ता :

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पेर्सोंनेल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, ९० फिट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, पश्चिम द्रुतगती मार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

विश्लेषक प्रोग्रामर-पायथन :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पूर्ण वेळ B. Tech / B.E. (संगणक विज्ञान / कॉम्प. अभियांत्रिकी) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प. सायन्स)

विश्लेषक प्रोग्रामर :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून ASP.Net सह पूर्ण वेळ B. Tech/ B.E. (संगणक विज्ञान / कॉम्प. अभियांत्रिकी) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प. सायन्स)

IT डेटाबेस प्रशासक :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पूर्ण वेळ B. Tech / B.E. (संगणक विज्ञान/ कॉम्प्युटर अभियांत्रिकी) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (कॉम्प. सायन्स)

प्रोग्रामिंग सहाय्यक :
पूर्ण वेळ बीएससी-आयटी, बीसीए, बीएससी- संगणक विज्ञान किंवा समकक्ष

वयोमर्यादा :

आयबीपीएसमधील भरती अंतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय २३ ते ३० वर्षांदरम्यान असावे.
(अधिक महितीसाठी मूळ जाहिरात वाचा.)

मिळणार एवढा पगार :

आयबीपीएस अंतर्गत विविध पदांवर निवड होणार्‍या उमेदवारांना एवढा पगार मिळणार आहे

विश्लेषक प्रोग्रामर – पायथन (Analyst Programmer-Python) : ३५,४०० रुपये प्रतिमहिना

विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net (Analyst Programmer-ASP.Net) : ३५,४०० रुपये प्रतिमहिना

आयटी डेटाबेस प्रशासक (IT Database Administrator) : ३५,४०० रुपये प्रतिमहिना

प्रोग्रामिंग सहाय्यक (Programming Assistant) : २५,५०० रुपये प्रतिमहिना
निवड प्रक्रिया :

1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. उमेदवार ०२ आणि ०४ जानेवारी २०२४ या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
4. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
5. उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी भरतीची मूळ जाहिरात वाचणे अनिवार्य असणार आहे.
काही महत्त्वाच्या लिंक्स :

आयबीपीएस भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.