Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
याच कारणामुळे यशराज फिल्म्सचा हा पाचवा स्पाय युनिव्हर्स चित्रपट या वर्षातील टॉप चार सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. ‘टायगर ३’ने चार दिवसांत केवळ १६९.५० कोटींची कमाई केली आहे, तर ‘जवान’ने ३०० कोटींच्या जवळपास पोहोचून २८६.१६ कोटींची कमाई केली होती.
याशिवाय शाहरुखचा दुसरा चित्रपट आणि स्पाय युनिव्हर्सचा चौथा चित्रपट ‘पठाण’ने २२० कोटींची मोठी कमाई केली होती. या दोन चित्रपटांशिवाय जर सनी देओलच्या ‘गदर २’ बद्दल बोलायचे झाले तर त्याने पहिल्या चार दिवसांत १७३.५८ कोटींची कमाई केली होती. वीकेंडला रिलीज न करण्याच्या निर्णयामुळे चित्रपटाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. टायगर ३ च्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा जाणून घेऊ.
‘टायगर’ फ्रँचायझीच्या या नव्या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खान टायगरच्या भूमिकेत तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत शत्रूंना नामोहरण करताना दिसत आहे. लोकांना या चित्रपटाची कथा आणि दमदार अॅक्शन सीन आवडले असून समीक्षकांकडूनही चित्रपटाला प्रशंसा मिळाली आहे.
‘टायगर ३’ची कमाई चौथ्या दिवशी ओपनिंगहून निम्मी झाली
Sacnilk च्या अहवालानुसार, ‘टायगर ३’ ची कमाई चौथ्या दिवशी ओपनिंगपेक्षा निम्मी झाली. सलमानच्या चित्रपटाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली होती, तर चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या बुधवारी चित्रपटाने निम्मी म्हणजे केवळ २२ कोटींची कमाई केली आहे. मात्र, ही आकडेवारी प्राथमिक असून, खरा आकडा आणखी काही कोटी असू शकतो. ‘टायगर ३’ ने मंगळवारी म्हणजेच फक्त एक दिवस आधी पहिल्या दिवशीच्या बरोबरीची कमाई केली होती आणि सोमवारी सर्वाधिक ५९ कोटी रुपये होती.
‘टायगर ३’ ने चार दिवसांत जगभरात किती कमाई केली?
‘टायगर ३’ तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. ज्यात हिंदी, तमिळ आणि तेलुगूचा समावेश आहे. ‘टायगर ३’च्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर, तीन दिवसांत या चित्रपटाने २३६.०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे, तर चार दिवसांत तो जवळपास २७० कोटी रुपयांचा आकडा गाठताना दिसत आहे. तीन दिवसांत ‘टायगर ३’ ने परदेशात जवळपास ५९.१५ कोटींची कमाई केली आहे.
‘टायगर ३’ची जबरदस्त स्टारकास्ट
चित्रपटातील दमदार स्टारकास्ट हा देखील ‘टायगर ३’चा प्लस पॉइंट आहे. यामध्ये सलमान खान अविनाश सिंह राठौर उर्फ टायगरची भूमिका साकारत आहे. सिनेमात कतरिना त्याची पत्नी झोयाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात इमरान हाश्मीने आतिश रहमानच्या खलनायकाची भूमिका उत्तम साकारली आहे. याशिवाय शाहरुख खान आणि हृतिक रोशनही कॅमिओ भूमिकेत आहे. चित्रपटाच्या १२ अॅक्शन सीक्वेन्सची जबरदस्त धमाल प्रेक्षकांच्या डोक्यावरून जात असल्याचे दिसते. सलमान आणि अरिजित सिंग यांनी १० वर्षांच्या मतभेदानंतर एकत्र काम केल्यामुळे या चित्रपटातील गाणीही लोकांना आवडत आहेत.