Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी वाचून व्हाल अवाक्, म्हणाल ‘यात तर एक घर खरेदी होईल’

7

Dhirubhai Ambani International School : व्यवसायासोबतच शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवू पाहणार्‍या, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी २००३ मध्ये ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची स्थापना केली. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मुंबईत धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा पाया रचला. सध्या ही शाळा भारतातील टॉपच्या शाळांमध्ये गणली जाते. त्यामुळे ही शाळा सेलिब्रिटीजची पहिली पसंती असते.

अनेक सेलिब्रिटी किड्स, बड्या अधिकार्‍यांची आणि उद्योजकांची मुले, या शाळेत शिकत असल्यामुळे ‘अंबानी स्कूल’ हा अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपूर्वी ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला आणि त्यानंतर मात्र या शाळेची चर्चा पुन्हा रंगली.

या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला पालक म्हणून हजेरी लावली होती. त्यामुळे कोणत्याही नामांकित पुरस्कार सोहळ्यापेक्षा हा सोहळा काही कमी नव्हता. शिवाय, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या अप्रतिम कामगिरीपासून ते शाहरुख खानचा मुलगा अबराम याने वडिलांची सिग्नेचर पोज रिक्रिएट केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील तारांकित वार्षिक कार्यक्रमही बहुचर्चित विषय ठरला. मात्र आज या शाळेबद्दल तुम्हाला माहीत नसणारी काही माहिती आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलबद्दल :

शाळेची स्थापना २००३ मध्ये नीता अंबानी यांनी संपूर्ण भारतातील मुलांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या हेतूने या शाळेची स्थापना करण्यात आली होती. १,३०,००० स्क्वेअर फूट पसरलेल्या ७ मजली इमारतीत आधुनिक सुविधा आणि उच्चस्तरीय शिक्षण व्यवस्था आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल फी लाखांच्या घरात :

या शाळेत एलकेजी ते बारावीपर्यंत वर्ग चालतात. शाळेत सीआयएसई, सीआयई, आयसीएसई, आयजीसीएसई बोर्ड आहेत. ११ आणि १२ साठी खास इंटरनॅशनल बेकालुरेटचा आयबी डिप्लोमा दिला जातो.

अनेक अहवालांनुसार, शाळेची फी विविध इयत्तानुसार वेगवेगळी आहे :

  • एलकेजी इयत्तेपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्याची फी : १.७० लाख रुपये आहे.
  • इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शुल्क : ४.४८ लाख रुपये आहे.
  • तर, इयत्ता ११ आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना सुमारे ९.६५ लाख रुपये फी भरावी लागते.

शाळेविषयी बहुचर्चित गोष्टी :

  • आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल. पण, Dhirubhai Ambani International School (डीएआयएस) चा शालेय गणवेश Bollywood मधील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीच डिझाइन केला आहे.
  • ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ मधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दोन डायनिंग हॉल आणि अत्याधुनिक किचनसह कॅफेटेरिया आहेत. शिवाय, बहुचर्चित डीएआयएसमधील जेवणाचा मेन्यू सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी तयार केला आहे.
  • इतकेच नव्हे तर, शालेय गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले असून शंकर, एहसान आणि लॉय यांनी या गाण्याला संगीत दिल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जाता आहे.
  • अनेक नामांकित सिनेकलाकार, उद्योजक, बडे अधिकारी यांची मुलं शिकत असलेल्या या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमाला अर्थातच सगळे स्टार हजेरी लावतात. त्यामुळे, “DAIS स्कूल’ चा हा सोहळा एका बड्या अवॉर्ड नाईट्स’पेक्षा जास्त सेलिब्रिटी असणारा कार्यक्रम म्हटलं जातं.
  • कारण, आपल्या मुलांची काम आणि प्रगती बघण्यासाठी ही नामांकित मंडळी अगदी सामान्य पालक असल्यासारखे हजेरी लावतात आणि या सोहळ्याची मजा लुटतात.

सध्या या शाळेमध्ये ऐश्वर्या-अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, शाहरुख खानचा मुलगा अबराहम, करीना कपूरचा मुलगा तैमूर आणि शहीद कपूरची दोन्ही मुले मिशा आणि झेनही शिकत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.