Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

संतापजनक! शेजाऱ्याकडून तरुणीचा सातत्याने विनयभंग आणि धमक्या, त्रासाला कंटाळून मुलीने शिक्षण सोडले

9

म. टा. प्रतिनिधी, पुणे: सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीकडून वर्षभर सातत्याने होणारा त्रास, विनयभंग आणि धमक्यांना घाबरून एका तरुणीने महाविद्यालयीन शिक्षण न घेता घरी बसण्याचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील धनकवडी परिसरात घडला. या प्रकरणी पीडित मुलीने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिल्यानंतर, त्याची दखल घेऊन सहकारनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.

पीडित तरुणी आणि तिची आई धनकवडी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीचा आणि मुलीच्या आईचा जानेवारी २०२३मध्ये लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीवरून वाद झाला होता. त्यावेळी त्या व्यक्तीने मुलीच्या आईला मारहाण केली होती. या प्रकारानंतर मुलीच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती. त्या घटनेपासून संबंधित व्यक्ती पीडित मुलीला कोणत्या ना कोणत्या कारणावरून घालून पाडून बोलत होता. मुलगी घरातून बाहेर पडल्यावर ती व्यक्ती मुलीचा पाठलाग करीत होती. एकेदिवशी त्या व्यक्तीने पाठलाग करताना मुलीच्या समोर येऊन, ‘तुझ्या आईला आणि तुला बघून घेईन. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. माझ्यावर गुन्हा नोंदवून माझे काही झाले नाही,’ अशी धमकी मुलीला दिली होती.

पुण्यातील भीमाशंकर बनतंय स्ट्रॉबेरी हब…! १६ गावातील ४५ शेतकऱ्यांचा सहभाग, ६८ हजार रोपांची लागवड,वाचा सविस्तर
मुलीने घरातून बाहेर पडणेही केले बंद

मुलगी त्यांच्या अपार्टमेंटमधून ये-जा करीत असताना तिच्याकडे पाहून आरोपी अश्लील इशारे करीत असे. लिफ्ट बंद असल्यास मुलगी जिन्यातून ये-जा करीत असताना जिन्यात तिच्यासमोर उभे राहणे, मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करणे, घाणेरडे इशारे करणे, डोळा मारणे, तिचा हात पकडणे, अश्लील गाणे म्हणणे आणि तिचा फोन नंबर मागणे, असे प्रकार त्याने केले होते. या प्रकारांमुळे मुलगी खूप घाबरली होती. त्यामुळे तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला नव्हता; तसेच घरातून बाहेर पडणेदेखील कमी केले होते.

वर्षभर केला त्रास सहन

पीडितेची आई नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असत. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी तरुणीला त्रास देत होता. दरम्यान, आईला या गोष्टीचा त्रास होऊ नये, त्यामुळे मुलीने वर्षभर सर्व त्रास सहन केला. सततच्या मानसिक तणावामुळे मुलीचे वरचेवर डोके दुखत होते. त्यामुळे मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी मुलीच्या आईने तिच्याकडे मानसिक तणावाबद्दल चौकशी केली असता, तिने वर्षभर घडलेल्या घटना आईला सांगितल्या.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.