Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जवानची कमाई थांबेना, हा रेकॉर्ड करणारा शाहरुख खान ठरला बॉलिवूडचा पहिला अभिनेता

6

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीचा हा ‘जवान’ काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटानं जगभरात खळबळ उडवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या चित्रपटानं जगभरातील प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘जवान’च्या प्रचंड यशानं बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड पुन्हा नव्यानं लिहिले गेले आहेत आणि सिनेमाची खरी ताकद, अर्थातच निश्चित रूपानं त्याचा बादशाह शाहरुख खानला समोर आणलं आहे. तर ‘जवान’नं केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल जाणून घेऊयात.

कोट्यवधी क्लबमध्ये सर्वात जलद प्रवेश : ‘जवान’ केवळ सुपरहिट नाही, तर ती बॉक्स ऑफिसवरील त्सुनामी आहे. चित्रपटानं १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटी, ४०० कोटी, ५०० कोटी आणि १००० कोटी क्लबमध्ये छप्परतोड कमाई केली आणि राष्ट्रीय तसंच जागतिक बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट रेकॉर्ड निर्माण केले. यानं केवळ दक्षिणेत हिंदी चित्रपटांसाठी दरवाजे उघडले नाहीत, तर ‘जवान’नं उत्तर भारतीय बॉक्स ऑफिसवरदेखील नेत्रदीपक प्रभाव पाडला आहे.
मुक्तापेक्षा सायलीचं लाडकी! ऑनलाइन टीआरपीमध्ये जुईच्या ‘ठरलं तर मग’ने मारली बाजी; अरुंधतीचं स्थान कितवं?
‘जवान’नं ‘पठाण’ आणि अगदी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकलं आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. ‘जवान’नं जागतिक स्तरावर रु. १००० कोटींचा टप्पा ओलांडला असून, बॉक्सऑफिसवर एक अजेय सुपरस्टार म्हणून शाहरुख खानचे स्थान आणखी दृढ केले आहे. ‘जवान’ केवळ ब्लॉकबस्टर नाही, तर या चित्रपटात अनेक संदेश देण्यात आले असून, ते एका शक्तिशाली भावनेनं देशाला एकत्र आणतात.

‘जवान’च्या रिलीजनं लोकांना पुन्हा थिएटरमध्ये आणलं आणि मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजा पुन्हा जागृत केली. त्याचं आकर्षक कथानक आणि रिपीट व्हॅल्यू यामुळं हा चित्रपट रसिकांसाठी मस्ट वॉच बनला आहे. ‘जवान’ हा सर्व चित्रपटप्रेमींसाठी एक सोहळा आहे, जो सर्व सीमा ओलांडून सिनेमाची जादू साजरी करत आहे. या चित्रपटाने शाहरुख खान, नयनतारा, ऍटली, विजय आणि दीपिका पदुकोणसह अनेकांच्या भूमिका आहेत
पावसाचा हाहाकार,मुंबई बुडाली, माणसं वाहून गेली…Mumbai Diaries 2 चा टीझर व्हायरल
‘जवान’ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटची असून एटलीचं दिग्दर्शन आहे. गौरी खान यांची निर्मिती आणि गौरव वर्मा याचे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.