Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

complaint against payal rohatgi: अभिनेत्री पायल रोहतगीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेस आक्रमक

11

हायलाइट्स:

  • अभिनेत्री पायल रोहतगीच्या विरोधात काँग्रेसने सीताबर्डी पोलिसांत दिली तक्रार.
  • पायल रोहतगीविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करा- काँग्रेस.
  • सकाळी पुण्यातही दाखल झाला रोहतगीविरुद्ध गुन्हा.

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नेहरू-गांधी कुटुंबीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीच्या (Actress Payal Rohatgi) विरोधात काँग्रेसने सीताबर्डी पोलिसांत तक्रार केली. शांतता भंग करून तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हे दाखल करून तत्काळ अटक आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने देशद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (after pune a complaint has been lodged against actress payal rohatgi in nagpur)

प्रदेश काँग्रेसचे सचिव संदेश सिंगलकर यांनी ही तक्रार केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी तसेच, गांधी कुटुंबीयांबद्दल वादग्रस्त माहिती पायल रोहतगीने समाजमाध्यमातून प्रसारित केली. यावरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पावणेसहा मिनिटांच्या व्हिडीओत अत्यंत खोटी, दिशाभूल करणारी व अफवा पसरवणारी माहिती आहे. मुद्दाम अवमानजनक व प्रक्षोभक भाषेचा वापर केला आहे. रोहतगीवर कलम १५३ (अ), ५०५ (१) (क) व (२) तसेच, माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी सिंगलकर यांच्यासह असंघटीत कामगार काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबाळकर, ओबीसी सेलचे सरचिटणीस चंद्रकांत हिंगे, चंद्रकांत वासनिक, नीलेश खांडेकर, मनीष छल्लानी आदींनी केली.

क्लिक करा आणि वाचा- करोना होईना कमी! ‘अशी’ आहे राज्यातील ताजी स्थिती; पाहा, संपूर्ण माहिती

रोहतगीविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल

महात्मा गांधी आणि काँग्रेस कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी रोहतगी हिच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पायल रोहतगीसह व्हिडिओ तयार करणाऱ्या एका अज्ञात आरोपीविरुद्ध देखील हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा; चंद्रकांत पाटलाचा मुख्यमंत्र्यांवर वार

पायल रोहतगी हिने राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि गांधी कुटुंबीयांविषयी बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केल्याची पायलवर आरोप आहे. या व्हिडिओमुळे हिंदू- मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे तिवारी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्या शिळ्या कढीला ऊत आणत आहेत; भुजबळांचे प्रत्युत्तर

पुणे काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी प्रथम सायबर पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली होती. मात्र सायबर पोलिसांनी नंतर ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.