Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Redmi 12C वरील ऑफर
Redmi 12C (६४जीबी+४जीबी RAM) तुम्ही फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करू शकता. ह्या फोनची MRP १३,९९९ रुपये आहे आणि तुम्ही हा ५०% डिस्काउंटनंतर ६,९९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच तुम्हाला अनेक बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. Flipkart Axis Bank Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला ५% Cashback मिळू शकतो. तसेच वेगळी ७ हजारांची सूट देखील मिळू शकते. सर्वात मोठा डिस्काउंट तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतगर्त मिळत आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सचेंज केलं तर त्याबदल्यात ५,६५० रुपयांची सूट मिळवता येईल. परंतु एवढा डिस्काउंट मिळवण्यासाठी जुन्या फोनची कंडीशन चांगली असावी आणि हे फोनच्या मॉडेलवर देखील अवलंबून असेल.
रेडमी १२सी चे स्पेसिफिकेशन्स
रेडमीच्या या बजेट फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा एफ/1.8 अपर्चरसह आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनला पॉवर करण्यासाठी कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi 12C मध्ये ६.७१ इंच डिस्प्ले आहे. स्क्रीन HD+ रिझोल्यूशन देते. स्क्रीनची ब्राइटनेस 500 nits आहे आणि डिस्प्लेवर वॉटरड्रॉप आकाराचा नॉच देण्यात आला आहे. रेडमीच्या या हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी, Mali-G52 2EEMC2 GPU आहे. हा स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 सह येतो. तसंच वर सांगितल्याप्रमाणे Redmi 12C मध्ये 4 GB RAM आणि 6 GB RAM सह 64 GB आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज हे सारे पर्याय आहेत. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.