Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी ग्राम दामू पाटील हे पत्नी प्रमिलाबाई यांचा एक मुलगा आणि पाच मुली आणि नातवंड असा परिवार आहे. ग्राम पाटील आणि पत्नी प्रमिलाबाई या दोघांनी शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलांना मोठं केलं, वाढवलं आणि शिकवलं. एवढंच नव्हे तर शेतकरी दाम्पत्याने त्यांच्या पाच मुलींचा विवाह सुध्दा धुमधडाक्यात पार पडला. पाच लेकींचा संसार गुण्यागोविंदाने सुरु आहे.
तर, दुसरीकडे ग्राम पाटील यांचा मुलगा किशोर सराफ व्यवसाय करतो. या व्यवसायात मुलानेही चांगली प्रगती केली आहे. सर्व कसं सुरळीत सुरु असताना, पाटील कुटुंबियांसाठी बुधवार हा दु:खाचा वार ठरला. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रमिलाबाई शालिग्राम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रमिलाबाई यांच्या निधनाने कुटुंबात शोकाचे वातावरण होते. तर, पत्नीच्या जाण्याने शालिग्राम पाटील यांनाही मोठा धक्का बसला होता. पत्नीच्या जाण्याचं दु:ख शालिग्राम हे पचवू शकले नाही आणि पत्नीच्या निधनानंतर अडीच तासानंतर शालिग्राम यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचेही निधन झाले.
दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, मेहरुणवासीय सुन्न
एकाचवेळी आई आणि वडिलांच्या जाण्याने पाटील कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलगा किशोर, सून, नातवंडांसह पाचही मुलींनी आई-वडिलांच्या निधनाचा आक्रोश केला. दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. एकाचवेळी दाम्पत्याच्या निघालेल्या अंत्ययात्रेने मेहरुण परिसरातील नागरिक सुन्न झाले होते. प्रमिलाबाई आणि शालिग्राम पाटील यांच्यावर गुरुवारी मेहरूण स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read Latest Maharashtra News And Marathi News