Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या घटने संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंजर येथील सर्वसामान्य कुटुंबातील शेख अयुब शेख बागवान यांचा ७ वर्षीय मुलगा शेख अफ्फान हा १९ डिसेंबर २०२३ पासून बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पिंजर पोलिसांत दाखल झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकासह संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. अखेर दहा दिवसानंतर पोलिसांना शेख अफ्फान याचा मृतदेह हाती लागला.
पिंजर शिवारातील एका विहिरी मध्ये या बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला होता. डॉग स्कॉडच्या साह्याने पिंजर पोलिसांना अपहरण झालेल्या सात वर्षीय बालकाचा शोध लावण्यात यश आले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंजर पोलीस शेख अफ्फानला शोधण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत होते. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
शेख अफ्फानचा केला गळा आवळून खून
शवविच्छेदन अहवालात शेख अफ्फान याचा गळा खुन झाल्याचा अभिप्राय प्राप्त झालाय. या घटनेसंदर्भात नव्याने रजू झालेले पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख शंकर शेळकेसह पिंजर पोलिसांची बैठक घेत गुन्हा उघडकिस आणणेबाबत महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता पुन्हा नव्याने तपास सुरू केला आणि तपासा दरम्यान काही गोष्टी समोर आल्या. मृत शेख अफ्फानचा चुलत १७ वर्षीय भाऊ याची विचारपूस केली असता त्यानेच् आपल्या भावाची गळा आवळून हत्या केली असल्याची कबूली दिली.
कबूतर सोडून दिल्यानं केलं भंयकर कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार १९ डिसेंबर रोजी मृत शेख अफ्फान आणि त्याचा चुलत १७ वर्षीय मारेकरी भाऊ हे दोघेजण घटनास्थळावरील विहिरीजवळ कबूतर पकडण्यासाठी गेले होते. दरम्यान विहिरीजवळ असलेल्या एका खोलीत मोठ्या प्रमाणात कबूतर असायचे, ते पकडण्यासाठी दोघे जण इथे आले होते. खोलीचा वापर नसल्याने अनेक दिवसांपासून बंद होती, त्यामुळ दोघेही जण खिडकीमधून आत शिरले. मृत शेख अफ्फान हा खिड़की जवळ थांबला अन् खिड़कीला पोत बांधून कबूतर पड़कले. थोड्यावेळाने शेख अफ्फान यानं कबूतर सोडून दिले, कबूतर सोडल्यानं मोठ्या भावाचा राग अनावर झाला अन् त्याच्याशी वाद घातला. वादा दरम्यान त्याने शेख अफ्फान याचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह विहिरीत फेकून दिला.
मुलाच्या शोधासाठी दीड लाखांचं होतं बक्षीस
मुलगा बेपत्ता असल्याने वडिलांनी मुलाच्या शोधार्थ बक्षीस जाहीर केलं होतं. हे बक्षीस होतंय तब्बल दीड लाखांचं होतं. तसेच मुलाचा शोध न लागल्यास अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या तालुका शाखेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर २ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. दरम्यान, बेपत्ता शेख अफ्फाम याचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला होता. शेख अफ्फान याचा मृतदेह पाहून उपस्थित सर्वांचे अश्रू अनावर झाले होते. आज अकोला पोलिसांनी या घटनेचा छडा लावाला आणि शेख आयुब बागवान कुटुंबाला न्याय दिला आहे.