Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अखेर १२ दिवसांनी पिंजर येथील खुनाचा उलगडा,अल्पवयीन भावानेच केला खुन…

9

बाप रे! शुल्लक कारणावरुन चुलत भावानेच भावाचा केला खून…

अकोला (प्रतिनिधी) – कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. 16 दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला. मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून मृतकाच्या विधिसंघर्षीत 17 वर्षीय चुलत भावानेच केला असल्याचे गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.

अकोला जिल्ह्यात नव्याजे रुजू झालेले पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने पहिलीच उत्कृष्ट कारवाई करीत सात वर्षाच्या मुलाचा हत्येच्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. दि.19 डिसेंबर 2023 पासून हरवलेला मुलगा शेख अफ्फान शेख अय्युब (रा.बागवानपुरा पिंजर) याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला, श्वान पथक व पिंजर येथील पोलिस तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर यांचे 12 दिवसांचे अथक प्रयत्नाने पिंजर-अकोला रोडवरील विहिरीत सापडला होता.

घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे,यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहनी केली त्यांचे सोबत उपविभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रमुख पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप. नि. गोपाल जाधव व पोलिस स्टेशन पिंजरचे ठाणेदार स. पो. नि. राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधीक्षकांनी तपासाबाबत सूचना दिली. त्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विचारपूस करीत, तांत्रिक माहिती व पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनावरून गुन्ह्यातील संशयित यांना ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता विधीसंघर्षीत  बालक वय 17 वर्ष व त्याचा चुलत भाऊ मयत मुलगा शे.अफफान वय 7 वर्ष हे शेतातील विहिरीचे बाजूला असलेल्या बंद खोलीतील कबुतर पकडण्यास गेले होते विहिरीचा बाजूला असलेल्या खोलीच्या खिडकीत मयत यास पोते पकडुन बसविले व विधिसंघर्षीत  बालकाने खोली मधून हाकललेले कबुतर मयत मुलाने जाणून बुजून सोडून दिले असा समज झाल्याने राग येऊन मृतक चा गळा आवळून धक्का दिल्याने खिडकी ला लागूनच असलेल्या विहिरीत पडून मृत्यु त्याचा म्रुत्यु झाल्याचे मयत शेख अफ्फान शेख अय्युब याचा खून त्याचा चुलत भाऊ विधी संघर्षित बालक (वय 17  वर्षे) याने केल्याची कबुली दिली.

सदरची  कारवाही वरीष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, फिरोज खान, रवी खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्रं मलीये, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडार, शेख अन्सार एजाज अहेमद, आकाश मानकर, धीरज वानखडे, उदय शुक्ला, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, चालक शेख नफीस, अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप, अनिल राठोड व तांत्रिक विश्लेषक राहुल गायकवाड, गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.