Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धक्कादायक! दारू पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी

10

हायलाइट्स:

  • वाकीतील फार्महाऊसमध्ये दारू पाजून १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार.
  • ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली.
  • याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून सूत्रधारासह तिघांना अटक.

नागपूर: वाकीतील फार्महाऊसमध्ये दारू पाजून १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून सूत्रधारासह तिघांना अटक केली. सूत्रधार मंगेश नामदेव हुडके (वय ३५, रा. काळे ले-आऊट, श्रीकृष्णनगर), आकाश राजेश खोटे (वय २९,रा. दुर्गानगर) आणि आरोपी ब्रिजलालसिंह ठाकूर (वय ४५, चंद्रिकापुरे ले-आऊट), अशी अटकेतील नराधमांची नावे आहेत. मंगेश हा चालक असून आकाश हा मेडिकलमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी तर, ठाकूर हा सोलरचे काम करतो. (the girl was gang raped under the influence of alcohol in nagpur)

पीडित विद्यार्थिनी बारावीत असून तिची लहान बहीण दहावीत आहे. तिचे वडील आजारी असून आई श्रमिक आहे. मंगेश हा विद्यार्थिनीच्या ओळखीचा आहे. ११ मार्च २०२० ला मंगेश हा विद्यार्थिनीच्या घरी आला. यावेळी घरी कोणी नव्हते. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर तो विद्यार्थिनीवर सतत अत्याचार करायला लागला. काही दिवसांपूर्वी मंगेश हा तिच्या घरी आला. तिला घेऊन तो वाकी येथील एका फार्महाऊसवर घेऊन गेला. याचदरम्यान आकाश व ठाकूरही तेथे आले. तिघांनी दारू प्यायली. तिघांनी विद्यार्थिनीला बळजबरीने दारू पाजली. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार? संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

अत्याचाराचे केले चित्रिकरण

मंगेशने अत्याचाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन तिघेही तिचे शारीरिक शोषण करायला लागले. तिघांचा छळ असह्य झाल्याने तिने वडिलांना याबाबत सांगितले. वडिलाने एका महिला सामाजिक कार्यकर्त्याला मदतीची विनंती केली. सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडित विद्यार्थिनीने मानकापूर पोलिसांत तक्रार केली.

क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात करोनाच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत मोठी घट; पाहा, आजची ताजी स्थिती!

पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मानकापूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिसांनी तिघांची पोलिस कोठडी घेतली आहे.

क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवाच्या तोंडावर रत्नागिरीत गावठी बॉम्ब सापडले, परिसरात खळबळ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.