Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळवण डेपोची कळवण-मालेगाव बस गुरुवारी देवळा शहरात प्रवेश करण्यापूर्वी सप्तशृंगी नगराजवळ वेगाने येत असताना पहिल्यांदा उजव्या बाजूच्या विजेच्या खांबाला धडक देत त्यांनतर डाव्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर धडकली. सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बसची पुढची डावी बाजू दाबली गेली असून, बसचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी या बसच्या मागेपुढे कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
अपघातातील जखमींची नावे
राहुल राजू कचवे (वय ३०, रा. चांदवड), वाय. एस. महाले (वाहक, वय ३०, रा. सुरगाणा), अकबर अली शहा (वय ५०, रा. मालेगाव), भिका रुपसिंग सोळंके (वय ७५, रा. नवेगाव), अरविंद गणपतराव जोंधळे (वय ६५, रा. कोल्हापूर), पांडुरंग शंकर साठे (वय ६४, रा. गडहिंग्लज), पुरुषोत्तम देवबा ठाकरे (चालक, वय ४६, रा. कळवण), हर्षल युवराज पगार (वय २०, रा. खुंटेवाडी), कोमल विकास शिरसाठ (वय २०, रा. देवळा), मोहम्मद मनु (वय २५, रा. मुझफ्फरनगर), सविता भावराव सूर्यवंशी (वय ४३, रा. देवळा), ओंकार बाबासाहेब येरुळे (वय २०, रा. राहुरी), मेहेरदिन अब्दुल गफर (वय ३४, रा. मुझफ्फरनगर), आकाश कृष्णा गांगुर्डे (वय २४, रा. देवळा), लखन हरी सोनवणे (वय ४०, रा. कळवण), योगिता लखन सोनवणे (३५, कळवण), उषाबाई पोपट थोरात (वय ४८, रा. पिंपळगाव)
जखमींना नेण्यासाठी मोलाची मदत प्राथमिक उपचार केल्यावर गंभीर जखमींना कळवण, मालेगाव, नाशिक, चांदवड या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. जखमींना बसमधून बाहेर काढत दवाखान्यात नेण्यासाठी संभादादा मित्रमंडळ, शिवराजे मित्र मंडळ यांच्यासह इतरांनीही तातडीची मदत करण्याचे सहकार्य केले. याशिवाय येथील देवळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचीही मोलाची मदत मिळाली. यावेळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, ज्योती गोसावी, आगारप्रमुख संदीप बेलदार, राजेंद्र अहिरे उपस्थित होते. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.