Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ॲल्यमिनियम तार चोरी करणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

7

अॅल्युमिनीअम चोरी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मौदा येथील अप. क्र. १२२७ / २३ कलम ३७९ भा.दं.वि. चे गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत असता गुप्त माहितगाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, कळमना येथे राहणारा नितीश प्रजापती हा मागील काही महिन्यापासुन कळमना वस्तीत राहून आपले साथीदारांसह मिळून तार चोरीचे गुन्हे करीत आहे. अशा खबरेवरून दि. ०५/०१/२०२४ रोजी  पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या आदेशाने तसेच पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी शिवशक्ती बारचे मागे असलेल्या एका झोपडीत सापळा रचुन तेथे तिन इसम

१) नितीश जुगराज कुमार (प्रजापती) वय २० वर्ष रा. परवेजपुर, पोस्ट अडया थाना खकरेडू जि. फतेहपुर (यु.पी.)

२) राधेशाम श्रीराममनोहर निसार वय १९ वर्ष रा.परवेजपुर, पोस्ट अडया थाना खकरेडू जि. फतेहपुर (यु.पी.)

३) ज्ञानेंद्रकुमार कल्लु निसार वय २० वर्ष रा. परवेजपुर,पोस्ट अडया थाना खकरेडू जि. फतेहपुर (यु.पी.)

तिन्ही रा.  ह. मु. शिवशक्ती बारचे मागे कळमना नागपूर यांना ताब्यात घेवुन त्यांना इलेक्ट्रीक पोल वरील तार चोरी बाबत सखोल विचारपुस केली असता अगोदर त्यांनी उडवाउडविचे उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगीतले की त्यांचा मुख्य साथीदार जो फरार आहे नामे
– निरजकुमार प्रजापती रा. पहाडपुर थाना किसनपुर जि. फतेहपुर (यु.पी.) याचे सोबत मिळून इंद्रेश छेदीलाल शाहू, वय २५ वर्ष, रा. पुराना कामठी रोड, शनी मंदीर जवळ कळमना, नागपूर याचे बोलेरो पिकअपचे मदतीने महालगाव, भुगाव, परसाड, गुमथळा तसेच कन्हान परिसरातील बंद असलेल्या इलेक्ट्रीक लाईन वरील अॅल्युमिनीयम तार कापून एकूण ०६ वेळा वेगवेगळया ठिकाणाहून अॅल्युमिनीयम तार कापून चोरी केल्याची कबुली दिली. व सदर चोरी केलेला अॅल्युमिनीयम तार हा कळमना येथील इंद्रेश शाहू याला विकल्याचे सांगीतले. तिन्ही इसमांना ताब्यात घेवुन सोबत
तिन्ही इसमांना त्याचेकडे विकलेल्या अॅल्युमिनीयम इलेक्ट्रीक ताराबाबत विचारणा केली असता सदर तार ०६ वेळा त्याचे कडे असलेल्या महिन्द्रा बोलेरो पिकअप मालवाहू कं. एम. एच- ४९ / डी – २८५९ ने आणल्याने सदर तार त्यांचे कडून घेतल्याची कबुली दिली व सदर तार हा त्याने आपले गोडावुन मध्ये विक्री करण्याचे उद्देशाने राखुन ठेवलेला असल्याचे सांगीतले. आरोपीतांच्या ताब्यातून मौजा महालगाव, झरप, चिखली, सिवनी, चिखली, परसाड, उमरी,परसाड शिवार तसेच कन्हान टोल नाक्याच्या मागे नविन गोंडेगाव शिवार असे एकुण ०६ ठिकाणाहुन चोरी केलेल्या
अॅल्युमिनीअम तार पैकी एकुण ३५५ किलो अॅल्युमिनीअम तार किंमती २,१३,००० /- रू. गुन्हयात वापरलेली महिन्द्रा बोलेरो पिकअप मालवाहू कं. एम. एच- ४९ / डी – २८५९ किमती ३,५०,००० /- रू. असा एकुण ५,६३,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे, सहायक फौजदार ज्ञानेश्वर राऊत, पोलिस हवालदार विनोद काळे, ईकबाल शेख, पोलीस
नायक संजय बरोदीया, चालक पोलीस हवालदार मुकेश शुक्ला यांचे पथकाने पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.