Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्ह्युविंग गॅलरीतून पाहता येणार अथांग समुद्र; मुंबईकरांना सापडलं नवं पर्यटनस्थळ

15

सुमारे १ हजार झाडे, सुंदर शिल्प, पर्यावरण-अनुकूल लाकडी साहित्याची व्यायामशाळा, निरीक्षण मनोरा, बांबूचे कुंपण अशी वैशिष्ट्ये असलेली माहिम रेतीबंदर चौपाटी नव्या रुपात आता पर्याटकांसाठी आकर्षण ठरले आहे.

लाकडी जिम

किनाऱ्यावर सुरुची २०० झाडे, टिकोमाची ३५०, चाफ्याची २०० आणि बाबूंची ३०० रोपे लावण्यात आली आहेत. त्याशिवाय किनाऱ्याभोवती बांबूचे कुंपण तयार करण्यात आले असून लाकडापासून तयार केलेली व्यायामाची साधने या ठिकाणी आहेत. व्ह्युविंग गॅलरी देखील उभारण्यात आली आहे.

चार कोटी रुपये खर्च

मुंबईकरांसह पर्यटकांना मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण असते. मात्र, त्यातील रेतीबंदरची अवस्था बकाल झाली होती. त्यासाठी पालिकेने चार कोटी रुपये खर्च करून त्यास नवीन स्वरूप देत तिथे पर्यटन केंद्र तयार केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सुशोभिकरणाचे लोकार्पण केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सदा सरवणकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त हर्षद काळे, पालिका सहाय्यक आयुक्त किशोर दिघावकर आदी उपस्थित होते.

रेतीबंदरचा कायापालट

पालिकेने रेतीबंदरचा कायापालट करण्यासाठी विविध उपाय योजण्यात आले आहेत. वादळाचा तडाखा रोखण्यासाठी येथे सुरूच्या झाडांचा वापर करण्यात आला आहे. तसेच, मुंबईत पहिल्यांदाच लाकडी साहित्यापासून तयार केलेली खुली व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. या किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली असल्याने ती भरून काढण्यासाठी पाच फुटांपर्यंत रेतीचा वापर करण्यात आला आहे.

किनाऱ्यावर दगडाची पायवाट

माहिम येथील समुद्र किनारा संरक्षक भिंतीची डागडूजी करण्यात आली असून या भिंतीवर माहिम परिसरासह मुंबईची सांस्कृतिक वैशिष्ट्ये दर्शवणारी ललित चित्रे रेखाटण्यात आली आहे. तसंच, या समुद्र किनाऱ्यावर दगडाची पायवाट बनवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सहजतेने या किनाऱ्यावर फिरता येईल.

नवे पर्यटनस्थळ

माहिमचा किनारा पाहता यावा म्हणून सुमारे ३० मीटर उंचीचा निरीक्षण मनोरा देखील उभारण्यात आला आहे. या मनोऱ्यावरुन वांदे- वरळी सी लिंकसह अरबी समुद्र पाहता येतो. मुंबईतील पर्यटकांसह देश विदेशातील पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण केंद्र खुले झाले आहे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.