Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करणाऱ्या महीलेस २४ तासात अकोला पोलिसांनी केली अटक…

6

चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला रामदासपेठ अकोला पोलिसांनी केली अटक…

अकोला (प्रतिनिधी)- शहरातील महाकाली कॉलनीमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी २४ तासांच्या आत चिमुकलीचा शोध घेत अपहरणकर्त्या महिलेला अटक केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०५जानेवारी) रोजी पोलिस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे फिर्यादी रवी पावन मलाकार, (वय ३५ वर्ष), रा.प्रकाश नगर, महाकाली कॉलनी, मिनार स्टेशन जवळ, पो.स्टे. गांधी चौक, चंद्रपुर यांनी तक्रार दिली की, (दि.०५जानेवारी) रोजी त्यांची मुलगी कु.गुड्डी रवि मलाकार, (वय ०५ वर्ष), ही दुपारी १२.३० ते १४.०० वा. दरम्यान टिळकपार्क जवळील महादेव मंदीराजवळ, मुलांसोबत खेळत असतांना कोणी तरी अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवुन नेले अशा आशयाची तकार दिल्याने पोलिस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क्र.२९/२४ कलम ३६३ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास म.पो.उपनि. संजिवनी पुंडगे यांचे कडे देण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासात अपह्रुत मुलीचा व आरोपीचा शोध घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व रामदासपेठ पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली. त्या मध्ये रामदासपेठ पोलिसांना २४ तासाचे आत अपह्रुत मुलीचा व आरोपीचा शोध घेऊन गुन्हयातील महीला आरोपी नामे सलमा परवीन अकबरशा उर्फ अंजली रामदास तायडे, (वय ४० वर्ष), रा.बांबु वाडी शंकर नगर अकोटफैल अकोला हीस ताब्यात घेऊन तिला अपहत मुलगी हीचे बाबत विचारपुस केली असता तिने मुलीचे चॉकलेट दाखवून अपहरण केल्या बाबत कबुली दिल्याने तिचे राहते घर बांबु वाडी शंकर नगर येथुन अपहत मुलगी कु.गुड्डी (वय ०५ वर्ष) हीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले आहे. माञ कोणत्या उद्देशाने बालीकेचे अपहरण केले आहे याबाबतचा तपास पोलिस स्टेशन रामदासपेठ पोलिस करित आहेत.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, शहर विभाग, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, पोउपनि, संजिवनी पुंडगे, सफौ शाम शर्मा, पो.हवा. हसनखान, किरण गवई नापोशि. तोहीदअली, गितेश कांबळे, म.पो.शि. कावेरी ढाकणे, प्रियंका बागडे, पो.शि.अनिल धनबर, संदीप वानखडे, आकाश जामोदे, पोलिस स्टेशन.रामदासपेठ अकोला यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.