Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर आरोपींनी फोन द्वारे संपर्क करत आम्हाला शरण यायचं आहे असं सांगितलं. आम्ही आरोपींना शरण येण्याचा सल्ला दिला. पोलिसांनाही तशा प्रकारचा संपर्क केला होता. दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे एक पथक आलं. त्या पथकाला आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, त्यांनी काहीही ऐकलं नाही, असं शरद मोहोळ खून प्रकरणात अटक असलेल्या एका वकिलाने न्यायालयासमोर सांगितलं. आम्ही गेल्या १५ वर्षांपासून वकिली करत आहोत, असं सांगतानाच वकिलाला न्यायालयातच रडू कोसळलं. मात्र, तुम्ही काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, असं न्यायाधीशांनी सांगितलं.
प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने वकिलांना ८ जानेवारीपर्यंत तर अन्य सहा आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले दोघेही वकील हे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, वकील रवींद्र पवार, वकील संजय उढाण त्यांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.
मामाचा अपमान भाच्याने बदला घेतला
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरचा मामा नामदेव कानगुडे आणि शरद मोहोळ यांच्यात दहा वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी नामदेव कानगुडे हा सुतारदरा परिसरातच राहत होता. नामदेव कानगुडे याला शरद मोहोळ याने मारहाण केली होती. याचा राग साहिल उर्फ मुन्ना पोळेकरच्या डोक्यात होता. शरद मोहोळ याच्याशी वाद झाल्यानंतर नामदेव कानगुडे याला सुतारदरा परिसर सोडावा लागला. त्यानंतर तो भुगावला स्थायिक झाला. तेव्हापासूनचा राग डोक्यात असलेल्या मुन्नाने शांतपणे व्यवस्थित प्लॅन करून शरद मोहोळच्या टोळीमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तो शरद मोहोळ याच्यासोबत सावलीप्रमाणे वागू लागला आणि अखेर शुक्रवारी दुपारी शरद मोहोळ हा घरातून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडला असताना घरातून बाहेर पडताच शरद मोहोळ याच्यासोबत असणाऱ्या मुन्ना पोळेकर आणि दोन साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडून खून केला.
Read Latest Maharashtra News And Marathi News