Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कुख्यात गुंड व टोळीप्रमुख शाहरुख व डॅनी यांच्यासह टोळीवर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांची मकोका अंतर्गत कार्यवाही…
पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत लागोपाठ तिसऱ्या टोळी विरुध्द सन-2023 मधील दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख — शाहरुख फरिदखान पठाण व दुर्गेश उर्फ डॅनी खरे, व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई….
गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी, पुर्व इतिहास लक्षात घेवुन, जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता व वाढत्या संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याकरीता, संपुर्ण गोंदिया जिल्हयातील संघटीतरित्या गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगार यांचे विरुध्द कडक धोरण राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत,त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन रामनगर अंतर्गत दाखल गुन्हा क्र. 369/2023, कलम 386, 34 भादवी मधील फिर्यादी यास आरोग्य त्यांनी खंडणी मागितल्यामुळे त्यांचे विरुद्ध वरील कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयातील संघटितरित्या गुन्हे करणारे आरोपी नामे
1) शाहरुख फरीद खान पठाण* व 29 वर्षे राहणार गड्डाटोली गोंदिया
2) दुर्गेश उर्फ डॅनी रमेश खरे वय 31 वर्षे राहणार बसंत नगर गोंदिया
3) आदर्श उर्फ बाबूलाल भगत* वय 20 वर्षे राहणार – बापट चाळ गोंदिया
4)संकेत अजय बोरकर वय 20 वर्षे राहणार कन्हारटोली
यांनी नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने यातील क्र. 1 ते 3 यांना गुन्हयात अटक करण्यात आली असून क्र. 4 फरार आहे.
सदर गुन्हयाचे तपासात असे निष्पन्न झाले कि, नमूद गुन्हेगार हे संघटीतरित्या टोळी निर्माण करुन गोंदिया जिल्हयात त्यांची टोळी सक्रीय करुन जनसामान्यांच्या मनात भय व हिंसेचे वातावरण निर्माण केलेले होते,त्यांचा अंतीम हेतु स्वतः करीता आर्थीक फायदा मिळविणे हेच होते यातील टोळी प्रमुख याने मागील 10 वर्षाचे काळात वेगवेगळ्या साथीदारांचे मदतीने संघटितरित्या गुन्हे केलेले आहेत,तर शाहरूख पठाण याने एकटयाने 6 गुन्हे, दुर्गेश उर्फ डेनी खरे याने 13 गुन्हे, आदर्श याने 6 गुन्हे, तर संकेत बोरकर याने 5 गुन्हे केलेले आहेत
यांचे टोळीने मागील 10 वर्षापासुन ते आज पावेतो संघटितरित्या गुन्हयाची मालीकाच जणू सुरु केली होती या टोळी विरुध्द इतराचे जिवीतास किंवा वैयक्तीक सुरक्षिततेस धोक्यात आणणारी कृती करणे,*ईच्छापुर्वक दुखापत करणे, आपखुसीने दुखापत करणे, हमला करणे किंवा, खंडणी वसुल करणे, खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, जबरी चोरी,धमकी देणे , शिवीगाळ करणे या सारखे विविध गंभीर गुन्हे केलेले असुन टोळीची दहशत राहावी म्हणुन हत्यार जवळ बाळगुन नागरीकांमध्ये दहशत माजविने अशी कृत्य केलेली असुन त्यांचे टोळी विरुध्द विविध गुन्ह्यांची नोंद आहे. गैरकृत्याव्दारे मिळणारे पैशांवर नमूद गुन्हेगार हे एैश आरामाचे, आणि चैनिचे जिवन जगत होते
सदर आरोपीतांच्या गुन्हेगारी वृत्तीची सखोल माहिती घेवुन वेळीच दखल घेत पोलिस अधिक्षक,निखिल पिंगळे, यांनी पोलिस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा व पोलिस निरीक्षक पो.स्टे. रामनगर यांना सदर संघटीत टोळी विरुध्द मकोका (MCOCA) कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते..यावरून पोलिस निरीक्षक पो. स्टे. रामनगर व पो. नि. स्थानीक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी सदर गुन्हयातील नमूद चारही आरोपी विरुध्द मकोका (MCOCA) कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करुन सदरचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक गोंदिया यांनी पोलिस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर यांना दिनांक 20-12-2023 रोजी मंजुरीस्तव सादर केले होता दिनांक 05/01/2024 रोजी पोलिस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर – *369/ 2023, कलम 386, 34* भादवि या गुन्हयातील टोळी प्रमुख
1) शाहरुख फरीद खान पठाण वय 29 वर्षे राहणार गड्डाटोली गोंदिया
2) दुर्गेश उर्फ डेनी रमेश खरे वय 31 वर्षे राहणार वसंत नगर गोंदिया
व टोळीतील सदस्य
3) आदर्श उर्फ बाबूलाल भगत वय 20 वर्षे राहणार बापट चाळ गोंदिया.
4) संकेत अजय बोरकर वय 20 वर्षे राहणार- कन्हारटोली गोंदिया
यांचेविरुध्द मकोका (MCOCA) कायद्या अतर्गत कलमवाढ करुन पुढील तपास करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.सदर गुन्हयाचा तपास संकेत देवळेकर, उपविभागीय पोलिस अधीकारी, देवरी हे करीत आहेत
पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मकोका (MCOCA) अंतर्गत केलेल्या कारवाईमुळे जिल्हयात संघटीतरित्या गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण झाली असुन यापुढेही संघटीतरित्या गुन्हे करणाऱ्या विरुद्ध मकोका (MCOCA) कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे त्यामुळे संघटितरीत्या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची यापुढेही खैर नाही
सदरची मकोका कारवाई (MCOCA) पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, नित्यांनंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली दिनेश लबडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पो. नि.संदेश केंजळे, यांचे मार्गदर्शनात सपोनि राजू बस्तावडे, पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पो.हवा. चेतन पटले, प्रकाश गायधने, स्था.गु.शा. आणि स.फौ. राजू भगत, पो.हवा जनबंधू पो.स्टे. रामनगर, गोंदिया यांनी कारवाई पार पाडली आहे….