Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकनाथ शिंदेंकडून मनाचा मोठेपणा, वृद्ध दाम्पत्याला पुन्हा मिळालं हक्काच्या घराचं छप्पर

8

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी, पुणे: अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असाच काहीसा प्रकार पिंपरी – चिंचवड येथे सूरू असणाऱ्या नाट्यसंमेलनात पाहायला मिळाला. नवऱ्याच्या आजारपणाच्या खर्चासाठी एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन लाखांसाठी डोक्यावरील छप्पर विकावे लागले. मात्र, त्यानंतर राहण्यासाठी पूलाचा आणि झोपडीचा आसरा घेण्याची वेळ या वृद्ध दाम्पत्यावर आली. त्यामुळे या वृद्ध माऊलीने थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली. माऊलीच्या ही करूण कथा ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही गहिवरले आणि थेट आपल्या गाडीतून तीन लाख रुपये काढून या माऊलीच्या घरासाठी दिले. पोलिसांना सांगून माऊलीला घर पुन्हा मिळवून देण्याच्या सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीने केवळ सर्वांचीच मने जिंकून घेतली नाही तर, त्यांचे बडेदिलवाला हे स्वभाव वैशिष्टही अधोरेखित झाले.

पिंपरी – चिंचवड येथे होत असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी (६ जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमामध्ये सुभद्रा राजाराम खिलारे (वय ७२) आणि राजाराम बंडू खिलारे (वय ७५) हे वृद्ध दाम्पत्य मुख्यंमत्र्यांची भेट घेण्यासाठी धडपडत असल्याचे दिसले. सुभद्रा खिलारे यांनी आपल्या पतीच्या उपचारासाठी निगडी येथिल ओटास्किममधील आपले घर ३ लाख ३५ लाखांला विकले. खरे पाहता हे योजनेतील घर असल्याने विकता येत नाही. मात्र, उपाचारासाठी पैशांची अतोनात गरज असल्याने त्यांनी नोटरी पद्धतीने २०१६ मध्ये हे घर एका महिलेले दिले होते. त्यानंतर रामनगर येथे एक झोपडे उभारून हे दांम्पत्य राहत होते.

मोलमजुरी करून दोघे आपले चरितार्थ चालवत होते. मात्र, वयोमानामुळे आता त्यांना मोलमजुरी करणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे आता रहायचे कसे आणि कुठे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. आपली ही व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगितली तर नक्कीच काहीतरी मदत मिळेल, या विचाराने हे दाम्पत्य नाट्यसंमेलनस्थळी आले होते. त्यांची मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठीची धडपड ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी पाहिली. त्यामुळे उसगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची व्यथा ऐकून त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही त्यांची व्यथा ऐकून व्यथित झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट गाडी मधून ३ लाख काढून हे पैसे पोलिसांकडे देत हा विषय काय आहे, त्याची चौकशी करून या माऊलीला तिचे घर परत मिळवून देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक तेजस्विनी कदम यांना घटनास्थळी बोलावून त्या वृद्ध महिलेला आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात संबंधीत महिलेचे घर विकत घेणाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. तेव्हा या कुटुंबाने आम्ही घर घेण्याच्या बदल्यात पैसे दिले होते. आमचे पैसे परत मिळाल्यास घर परत देण्याचे लेखी आश्वासन पोलिसांना दिले. घरातील साहित्य हलविण्यासाठी दोन दिवसांची मुदत त्या कुटुंबाला देण्यात आली. दोन्ही कुटुंबाचे समाधान झाल्यावर दोघांकडून तसे लिहून घेण्यात आले.
‘राजपुत्र’ अमित ठाकरेंना मोठा धक्का, पुण्यातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार संबंधित वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचे घर विकत घेणारे कुटूंब यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याशी चर्चा केली. जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर याही या वेळी उपस्थित होत्या. सर्व प्रकार समजावून घेऊन घर विकत घेणाऱ्या कुटूंबाला घर पुन्हा देण्याची विनंती केली. त्यांनीही दिलेले पैसे परत मिळाल्यास लगेचच घर परत देण्याची तयारी दाखविली. दोन ते तीन दिवसांत या दाम्पत्याला त्यांचे घर मिळेल, असं निगडीच्या पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी सांगितले.
कोल्हापूर लोकसभेची जागा आम्हालाच मिळावी, मविआतील तिन्ही पक्षांची मागणी, उमेदवार मात्र एकच… शाहू महाराज!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मन दाखविल्याने आमचे घर आम्हाला परत मिळाले. आता आम्हाला पुन्हा एकदा आमचे हक्काचे छत मिळाले आहे, या गोष्टीचा मोठा आनंद होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे खूप आभार मानते, असं सुभद्रा खिलारे म्हणाल्या.
किरण मानेंनी मातोश्रीवर जाऊन बांधलं शिवबंधन; उद्धव ठाकरेंचं सर्वांदेखत वचन, म्हणाले…Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.