Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कारंजा घाडगे येथील दरोड्याची उकल करण्यात वर्धा पोलिसांना यश…

8

पोलिस स्टेशन कारंजा हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या दरोड्याची   उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,मुद्देमालासह  तीन आरोपी  अटकेत…

वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२३ चे रात्री दिलीप शंकर पालीवाल, वय ६५ वर्ष, रा. कारंजा घाडगे, ता.जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन कारंजा घाडगे येथे येऊन तक्रार दिली कि, फिर्यादीचे मामा नारायण पालीवाल यांची पत्नी व मुलगा गोपाल पालीवाल असे सुट्टी असल्याने नागपूर वरुन मौजा वाघोडा, ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा यांच्या शेतातील फार्म हाऊसवर मुक्कामी आले होते. तेव्हा रात्री अनोळखी आरोपींनी नारायण पालीवाल यांचे फार्म हाऊसवर जावुन गोपाल पालीवाल यास मारहाण करुन व चाकुचा वार करुन गंभीर जखमी केले व त्यांचे पत्नीचे गळ्यातील मंगळसुत्र, कानातले व तीन मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेवुन सर्वांना खोलीत कोंडुन शेजारील खोलीतील ५५ सोयाबीन धान्याचे कटटे याप्रमाणे एकुण १,९४,०००/- रु. चा माल दरोडा टाकुन वाहनात घेवुन निघुन गेले. याप्रमाणे फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरुन पोलिस स्टेशन,कारंजा घाडगे,येथे अप. क्र. ७३०/२३ कलम ३९५,३९७  भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता व याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील गाडे करीत होते परंतु  सदर दरोडा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे आदेशान्वये स्था.गु.शा. वर्धा यांचे कडुन सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु करण्यात आला. सदर गुन्हयाच्या तपासात कोणताही तांत्रिक व इतर पुरावा उपलब्ध नसल्याने सदर गुन्हा उघडकीस आणणे कठीण झाले होते. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या समांतर तपासात मिळालेल्या मुखबीरचे खात्रीशीर खबर तसेच प्राप्त तांत्रिक माहिती वरून सविस्तर विश्लेषन केले. वरुन सदर गुन्हा हा तरोडा, मार्डा, चांदुररेल्वे, जि. अमरावती येथे राहणारे सहा गुन्हेगारांनी घटनास्थळी जावुन सदर गुन्हा केल्याचे निश्पन्न झाल्याने यातील आरोपी नामे

१)सागर रतन पवार, वय ३८ वर्ष रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे, जि. अमरावती

यास तो मुंबई येथे पळुन जाण्याचे तयारीत असतांना अंत्यत शिताफीने अकोला रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेण्यात आले.

२) दिपक रतन पवार, वय ३२ वर्ष,  रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे, जि. अमरावती

हा धारणी येथे गेला असल्याचे व परतवाडा येथे परत येणार असल्याची माहिती वरून धारणी ते परतवाडा रोडवरील आर.टी.ओ.टोल नाका येथे नाकेबंदी करून त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तसेच

३) मनोज अशोक पवार, वय ३२ वर्ष, रा. मौजा तरोडा, ता. चांदुररेल्वे, जि. अमरावती यांस त्याने सदर गुन्हा करण्याकरीता वापर केलेल्या त्याचे मालकीचे अशोक लेलॅन्ड कंपनीचे दोस्त मालवाहु वाहन क्र. एमएच 27 बीएक्स 7290 सह चांदुर रेल्वे येथुन ताब्यात घेण्यात आले. यानंतर सदर तिन्ही आरोपींताना विचारपुस केली असता तिन्ही आरोपींनी प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांना विष्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगितले. वरुन सदर गुन्हयात वर नमुद तीन आरोपी यांना मालवाहू वाहन अशोक लेलॅन्ड कंम्पनीचे दोस्त वाहन किंमत अंदाजे ५,०००००/- रु. सह अटक करण्यात आली आहे. इतर आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक  नूरूल हसन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे, सहाय्यक पोलिस अधिक्षक/उप विभागीय पोलिस अधिकारी, पुलगांव राहुल चव्हाण, उप विभागीय पोलिस अधिकारी देवराव खंडेराव ,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा,सुनील गाडे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन कारंजा घाडगे, यांचे निर्देशानुसार पो.उपनि. अमोल लगड, सलाम कुरेशी, उमाकांत राठोड, सफौ मनोज धात्रक, पोहवा नरेन्द्र पाराशर, संजय बोगा, चंदु बुरंगे, पवन पन्नासे, अरविंद येणुरकर, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, पोना नितीन इटकरे, मनिश कांबळे, रामकिसन इप्पर, पोशि संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, विनोद कापसे, अभिषेक नाईक, अरविंद इंगोले सायबर शाखेचे पो.हवा. दिनेश बोथकर, अनुप कावळे, विशाल मडावी, पोशि अंकित जिभे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.