Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी माणसाचं इतिहास विसरणं, भूगोल अडचणीत ते कलाकारांना कानपिचक्या, राज ठाकरे काय म्हणाले?

10

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची “नाटक आणि मी ” या विषयावर खास मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी तरुणाई, मराठी कलाकार आणि राजकारण या विषयावर भाष्य केलं. दीपक करंजीकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. नाट्य क्षेत्र आणि भाषणाला रिटेक नसतो त्यामुळं अनेक गोष्टी भान ठेऊन कराव्या लागतात, असं राज ठाकरे म्हणाले. चित्रपटापेक्षा मला अधिक कुतूहल नाटकाचं आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

मराठ्यांचा इतिहास नाटक ते अटक असा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील आपला मराठी माणूस इतिहास विसरत चालला आहे. टीव्हीवरील मालिका आणि मोबाइलवरील रिल्स यात तो इतका अडकलेला आहे. मराठी माणसाला इतिहास आहे, मराठी माणूस राज्यकर्ता होता. आपण या हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो. इतका मोठा इतिहास असून आपण सगळं विसरत चाललोय.एकमेकांमध्ये भांडत बसलोय, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

मराठी चित्रपट मोठा आहे पण त्यात स्टार नाहीत. महाराष्ट्रात स्टार होते आपणच एकमेकांना लोकांसमोर शॉर्टफॉर्म नावानं हाका मारतात. तुम्ही तुमचा मान राखला नाही तर लोकं का तुम्हाला मान देतील, असा सवाल राज ठाकरेंनी केला.राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना महत्त्वाचा सल्ला दिल्ला. मराठी कलाकारांनी सार्वजनिक रित्या एकमेकांना आदर दिला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्या कलाकारांनी शॉर्टकट वापरु नयेत,असा सल्ला राज ठाकरेंनी मराठी कलाकारांना दिला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये जे अभिनेते आहेत ते एकमेकांना आदर देतात. रजनीकांत आणि इलाई राजा एकमेकांना रजनीसर, ईलाई सर, कमला सर, म्हटलं जातं त्याप्रमाणं आपल्या इकडच्या कलाकारांनी अशोक सराफ यांना अशोकमामा म्हणण्याऐवजी अशोक सर म्हणा, असं राज ठाकरे म्हणाले. एकमेकांना आदर दिला पाहिजे. मी व्यासपीठावर बसलोय आणि आता जर इथं शरद पवार साहेब आले तर त्यांना वाकून नमस्कार करीन, माझ्या महाराष्ट्रातील बुजूर्ग नेता आहे. व्यासपीठावर काय बोलायचं हा विषय वेगळा आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
ADITYA-L1: अभिमानास्पद! इस्रोची नवी भरारी, ‘आदित्य एल १’ यान नियोजित कक्षेत दाखल
आम्ही गेल्या ७० वर्षांपासून त्याच मुद्यांवर निवडणूक लढतोय, आपण पुढं कधी जाणार आहोत. ही स्थिती असताना कलाकार, चित्रपट, गायक, नाटककार नसते तर या देशात कधीच अराजक आलं असतं. कलाकारांमध्ये हा देश गुंतून पडला त्यामुळं त्यांचं इतर गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, असं राज ठाकरे म्हणाले.
‘स्वच्छ सर्वेक्षणा’त पिंपरी दुसरे; कचरामुक्त शहरासाठी प्रथमच ‘वॉटर प्लस’ पुरस्काराने गौरव
महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे, जमीन तुम्हाला कळत नाही इतक्या चलाखीनं विकत घेतली जातेय. जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व, तेच जर तुमच्याकडून निघून गेलं. जातीपातीत इतर गोष्टीत इतकं मश्गूल झालो की आपलं स्वत:चं काय ते विसरुन गेलो. सातव्या शतकात जन्माला आलेली मराठी आपण घालवून बसतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, भेटीसाठी धडपडणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा प्रश्न सोडवला, हक्काचं घर पुन्हा मिळवून दिलं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.