Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देशात काँग्रेसमय वातावरण, भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी एकत्र या : सिद्धरामय्या

11

अहमदनगर : ‘भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढून पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट पक्ष असून कर्नाटक मध्ये ४० टक्के कमिशन घेत होते. त्यामुळे जनतेने त्यांचा मोठा पराभव केला. सध्या संपूर्ण देशात काँग्रेसमय वातावरण असून भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशाताब्दीनिमित्त संगमनेरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये थोरात आणि शिंदे यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण सिद्धरामय्या आणि मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते.

सिद्धरामय्या म्हणाले, केंद्र सरकारने केंद्रीय सहकार कायदा करून राज्यांच्या हातात सूत्रे असलेली सहकार चळवळ केंद्रीभूत करून मोडीत काढण्याचा घाट घातला आहे. ग्रामीण भागाला सशक्त बनविणारी ही सहकार चळवळ वाचविण्यासाठी देशातील राज्य सरकारांनी एकत्र यावे. भारत अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण आहे तो फक्त काँग्रेसमुळेच. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्ष लढला. आत्ताचे सत्ताधारी त्यावेळेस कुठेही नव्हते. मागील सत्तर वर्षातील प्रगती ही काँग्रेसमुळे झाली. आता भाजपा वसाहतवाद आणत असून लोकशाही व संविधान धोक्यात आहे, असेही सिद्धरामय्या म्हणाले.
गद्दारांच्या टोळीने शिक्षणाचा बट्ट्याबोळ करून टाकलाय, विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्करराव जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार झिशन सिद्दकी, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, आमदार लहू कानडे यांच्या राज्यभरातील आजी-माजी मंत्री काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. इतरही मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आभार मानले.
दिघा स्थानकासाठी आदित्य ठाकरे मैदानात; राज्य सरकारवर जोरदार टीका, म्हणाले – जनतेचे नाही तर खोकेदारांचे अच्छे दिन

जितेंद्र आव्हाडांचे रामकृष्ण हरी!

माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम कृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली, आपण कायम गांधीवादी विचार जपला. जिवंत आहे तोपर्यंत हा विचार आपण सोडणार नाही. संगमनेरमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून येथे निष्ठा जपली आहे. मी ही कायम निष्ठा जपली असून बापाला घरी बसा असे सांगणारे काही लोक आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे कायम पुरोगामी विचारांची ताकद राहिली. आपण मरेपर्यंत त्यांच्यासोबत राहू, असे म्हणून पुन्हा एकदा राम कृष्ण हरी म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला. भास्करराव जाधव यांनीही जोरदार भाषण करीत थोरात यांच्या कामाचे कौतूक करीत भाजपच्या नेत्यांवर टीका केली.
राज ठाकरे ऑन ग्राऊंड, खालापूर टोलनाक्यावर अधिकाऱ्यांना ठाकरी बाणा दाखवला, वाहनांच्या रांगा लागल्यानं खडसावलंRead Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.