Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

थरथरत्या हातांनी कोर्टासमोर विनवणी, नरेश गोयल म्हणाले, ‘तुरुंगातच मेलो तर चांगले होईल…’

6

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आता आयुष्याकडून माझ्या काही अपेक्षाच उरलेल्या नाहीत. मी तुरुंगातच मेलो तर चांगले होईल. कारण मी प्रचंड अशक्त झालो आहे. अनेकदा लघुशंकेतून रक्त येते. मदतीला कोण नसते. तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्याही मदतीसाठी मर्यादा आहेत. दुसरीकडे माझी पत्नी कॅन्सरने ग्रस्त असल्याने अंथरुणाला खिळलेली आहे. तिच्या मदतीसाठी असलेली आमची एकुलती एक मुलगीही आजारी असते…’, असे थरथरत्या हातांनी विनवणी करत आरोपी नरेश गोयल यांनी शनिवारी विशेष पीएमएलए न्यायालयाला सांगितले. त्याची न्यायाधीशांनीही दखल घेतली आणि त्यांच्या प्रकृतीबाबत आवश्यक ते पावले उचलण्यास त्यांच्या वकिलांना सांगतानाच त्यांच्या जामीन अर्जावर १६ जानेवारीला सुनावणी ठेवली.

जेट एअरवेजच्या नरेश गोयल यांच्या ५३८ कोटींच्या मालमत्तेवर टाच, दुबई-लंडनमधील बंगल्यांचाही समावेश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल हे कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी ६२ लाख रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याबद्दल १ सप्टेंबर २०२३पासून कोठडीत आहेत. अटक कारवाईला आव्हान देणारी त्यांची याचिका उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फेटाळली होती. त्यानंतर आपण विविध आजारांनी ग्रस्त असल्याने जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी अर्जाद्वारे केली आहे.

Naresh Goyal: मला यातना असह्य झाल्यात, शरीर फारकाळ साथ देणार नाही; ED कोठडीत असलेल्या उद्योगपतीची आर्त साद

‘माझ्या गुडघ्यांना सूज आली आहे. ते प्रचंड दुखत आहेत. लघुशंका करताना प्रचंड वेदना होतात. माझे विविध आजार बळावत चालले आहेत. मला जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात काही अर्थ नाही. कारण तिथे रुग्णांची गर्दी असते आणि डॉक्टर लगेच उपलब्ध होत नाहीत. त्याचप्रमाणे मला आता प्रत्येक वेळी प्रत्यक्ष न्यायालयात येणेही झेपणारे नाहीत. त्यामुळे व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यास सांगावे. जेणेकरून मी माझे म्हणणे थेट मांडू शकेन’, असेही गोयल यांनी न्यायालयाला सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.