Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निम्मे काम फत्ते! पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी मार्गाच्या कामाला गती; जाणून घ्या प्रकल्प

8

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी – ३ प्रकल्पसंचांर्तगत नवीन पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वेचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. तीन नव्या स्थानकांचा समावेश असलेल्या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे प्रवाशांना कर्जतहून पनवेलसाठी थेट लोकल उपलब्ध होणार आहे. सध्या कर्जतमधील प्रवाशांना ठाणे स्थानकात जाऊन ट्रान्सहार्बरने पनवेल गाठावे लागत आहे. कर्जत-पनवेल लोकल सुरू झाल्यानंतर ठाणे स्थानकातील गर्दीत १० ते १५ टक्क्यांनी घट होणार आहे.

प्रकल्प मंजूर – जानेवारी २०१८

मंजूर प्रकल्प खर्च – २,७८२ कोटी

सद्यस्थिती

खर्च – ५० टक्के

प्रत्यक्ष काम – ५० टक्के पूर्ण

मुंबई सागरी किनारा मार्ग होणार १२ तासांसाठी खुला, दोन प्रकल्पांची नववर्षांत भेट
भूसंपादन

– ५६.८२ हेक्टर खासगी जागा

– ४.४ हेक्टर सरकारी जागा

– ९.१३ हेक्टर वनजमीन

नव्या स्थानकांची पायाभरणी

– चिखली, मोहापे, चौक या नव्या स्थानकांसाठी ऑगस्ट २०२३मध्ये कंत्राटदार नियुक्त

– सप्टेंबरपासून स्थानक इमारत उभारणीसाठी पायाभरणीसह अन्य कामे सुरू

बोगद्यांच्या कामाला गती

– नव्या रेल्वे मार्गात तीन बोगदे असून यातील टी-१ (टनेल -१) बोगद्याचे २१९ मीटरचे काम पूर्ण

– टी-२ बोगद्याचे ९४४ मीटरचे खोदकाम पूर्ण

– टी-३ बोगद्याचे १२२ मीटरचे खोदकाम पूर्ण

लहान-मोठ्या पुलांची सद्यस्थिती

बांधकाम – पूर्ण झालेले – बाकी असलेले

मोठे पूल – ३ – ५

लहान पूल – १७ – १६

आरयूबी (रोड अंडर ब्रीज) – ४ – ११

(सर्व पुलांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती पूर्ण)

रेल्वे उड्डाणपुलांची स्थिती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल

– पुलांच्या गर्डरला आधार देणाऱ्या दोन्ही बाजूंकडील खांबांची उभारणी पूर्ण

– ४ गर्डरपैकी डिसेंबर २०२३ ला पहिल्या गर्डरची यशस्वी उभारणी

पनवेल रेल्वे उड्डाणपूल

– पुलाच्या डेक स्लॅबचे काम सुरू

– एका मार्गिकेवरील १७ स्पॅन उभारणी पूर्ण

कर्जत रेल्वे उड्डाणपूल

– पुलाच्या डेक स्लॅबचे काम सुरू

– एका मार्गिकेवरील १७ स्पॅन उभारणी पूर्ण

मोहापे रेल्वे उड्डाणपूल

– पुलाच्या गर्डर जोडणीचे काम सुरू

– गर्डरचा आधार देणाऱ्या खांबाचे काम पूर्ण

नव्या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम नियोजनानुसार सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे.

– सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ

मनोज जरांगेंची कुणबी नोंद सापडली; शिरुर कासारमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून फेरतपासणी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.