Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

jugaad spray machine: जबरदस्त! शेतकऱ्याने तयार केले ‘जुगाड’ फवारणी यंत्र; २० मिनिटांत दोन एकर शेतीची फवारणी

19

हायलाइट्स:

  • यवतमाळचे शेतकरी दिलेश परडखे यांनी तयार केले फवारणी यंत्र.
  • हे यंत्र २० मिनिटांत २० एकर शेतीची फवारणी करते.
  • या यंत्रासाठी शेतकरी परडखे यांना विभागातून फवारणीसाठी बोलावले जात आहे.

रवी राऊत/यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्याच्या राणी अमरावती येथील दिलेश परडखे या शेतकऱ्याने ट्रॅकर वर फवारणी यंत्र लावून शेतांत फवारणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे यंत्र त्यांनी स्वतः तयार केले आहे. या जुगाड तंत्रज्ञानामुळे फवारणी करताना कुठलीही विषबाधा फवारणी करणाऱ्या व्यक्तीला होत नाही. शिवाय २० मिनिटांमध्ये २ एकर क्षेत्रात फवारणी होत असल्याने या यंत्रांची पंचक्रोशीत चर्चा आहे. (yavatmal farmer made jigaad spray machine sprays 2 acres in 20 minutes)

सर्वत्र चर्चेत असलेले शेतकरी दिलेश परडखे यांनी त्यांच्याकडील ट्रॅक्टरला समोर ३ फूट आणि मागे चाक ४ फूट उंचीची मोठी चाके लावली आहेत. यामुळे सोयाबीनच्या दाट पिकात सुद्धा योग्य पध्दतीने आणि योग्य दाबाने फवारणी करता येणे शक्य झाले आहे. एकसारखी फवारणी झाल्याने पिकांवरील अळी नष्ट करण्यासाठी या फवारणीचा योग्य परिणाम देखील जाणवतो.

क्लिक करा आणि वाचा- माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या ‘या’ विधानाने अनेकांच्या उंचावल्या भुवया

या ट्रॅकर द्वारे पिकांचे डवरण सुध्दा करता येत असल्याने पिकांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन सुध्दा मिळत आहे. शिवाय असे करतांना पिकांचे नुकसान देखील होत नाही. त्यामुळे पिकांची चांगली वाढी होण्याच्या दृष्टीने याचा लाभ होतो.

कीटकनाशकांची फवारणी करतांना ट्रॅक्टर वरील व्यक्ती थेट कीटकनाशकाच्या संपर्क येत नसल्याने तिला विषबाधा होत नाही. यासाठी परडखे यांनी घरी असलेल्या २०० लिटर प्लास्टिक ड्रमचा वापर फवारणीचे द्रावण ठेवण्यासाठी केला आहे. त्यांनी ड्रमला स्थानिक बाभूळगाव येथून वेल्डिंग करून घेत त्यास दोन बाजूंनी अडजेस्टेबल लांब पाईप लावला आहे. शिवाय त्याला ११ नोजल दिले आहेत. त्यामुळे त्याद्वारे ऐकावेळी २ ओळीत फवारणी करता येते. तसेच तुरीसारख्या पिकात सुध्दा यामुळे फवारणी ९ फूट उंची पर्यंत करता येते.

क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना ‘हे’ खुले आव्हान; म्हणाले, ‘हिम्मत असेल तर…’

जिल्ह्यात अनेक व्यक्ती फवारणी करताना हॅन्डपंपाच्या यंत्राद्वारे फवारणी करतात. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करताना काहींना विषबाधा होते. त्यातून काही जण अत्यवस्थ होवून त्यांचा मृत्यूसुध्दा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दिलेश परडखे यांनी स्वतः हे फवारणी यंत्र तयार केले आहे. यासाठी त्यांना २० हजार रुपयांचा खर्च आला असून आता आजूबाजूच्या भागातील शेतकरी त्यांना फवारणीसाठी बोलावीत आहे.

क्लिक करा आणि वाचा- नारायण राणेंच्या टीकेनंतर आता नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.