Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,६ मोटारसायकल केल्या जप्त…

11

मोटार सायकल चोरट्यास 06 मोटर सायकलीसह. अटक, मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी….

गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,, पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, स्था.गु. शा. गोंदिया यांना जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला  ला दाखल मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेवून विशेषतः मोटर सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते

त्याअनुषंगाने  पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांनी स्था. गु. शां. येथील पोलिस अधिकारी- अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून याबाबत सूचना देवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे मार्गदर्शन करण्यात आले होते याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला ला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी, व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांची संपुर्ण माहिती घेण्यात येवून गुन्हे शाखा पथका कडून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते,स्थानिक गुन्हे शाखेचे, पथक मोटार सायकली चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना दिनांक 6/1/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, पोलिस स्टेशन रामनगर येथे दाखल अप. क्र. 332/2023 कलम 379 भा.दं.वि. गुन्ह्यातील चोरीस गेलेली 1) एक काळया रंगाची रॉयल इनफिल्ड बुलेट क्र. एम. एच. 49 एवाय-7595 ही मोटर सायकल सराईत गुन्हेगार ईसंम नामे

1) विवेक ऊर्फ राजा नरेंद्र कनोजे रा.गडडा मोहल्ला, ता.जि. बालाघाट (म.प्रदेश)

2)अतुल श्यामलाल बिसेन रा. लिंगा (परसवाडा) ता. जिल्हा- बालाघाट (म.प्रदेश)

यांनी चोरलेली असून गोंदिया, नागपूर, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणा वर स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मोटार सायकली चोरल्या आहेत आणि विक्रीच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत अश्या प्राप्त खात्रीशिर माहिती वरुन व सदर माहितीची शहानिशा केल्यानंतर मोटारसायकल  चोरटा सराईत गुन्हेगार आरोपी नामे

1) विवेक ऊर्फ राजा नरेंद्र कनोजे वय 20 वर्षे रा. गडडा मोहल्ला, ताजनगर ता. जिल्हा- बालाघाट (म.प्रदेश)

यास रामनगर गुन्ह्यातील चोरीची मोटार सायकल बुलेट गाडी-
1) एक काळया रंगाची रॉयल इनफिल्ड बुलेट क्र. एम.एच.49 एवाय- 7595 सह त्याचे राहते घरून बालाघाट येथुन ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आले आहे.. ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार विवेक उर्फ राजा यास चोरी केलेल्या ईतर मोटार सायकली बाबत कसून चौकशी, विचारपूस केली असता त्याने सुरवातीस उडवा- उडविचे उत्तरे दिली.पुन्हा विश्वासात घेवून त्यास विचारपूस केली असता त्यांनी गोंदिया, नागपूर, कामठी अश्या विविध ठिकाणाहून त्याचा साथीदार फरार आरोपी नामे  2) अतुल श्यामलाल बिसेन वय अंदाजे 24 वर्षे रा.लिंगा (परसवाडा) ता.जिल्हा- बालाघाट (मध्यप्रदेश) याचेसोबत मिळुन
मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले

नमूद सराईत गुन्हेगार आरोपी यांचे सांगणेप्रमाणे त्याचे ताब्यातून त्यांनी त्याचा साथीदार मित्र अतुल बिसेन सोबत गोंदिया, नागपूर, कामठी अश्या विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या व विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या विना नंबर/खोटे क्रमांक असेलल्या *खालील वर्णनाच्या मोटर सायकली

2) एक होन्डा शाईन ग्रे रंगाची निळा पांढरा पटटा असलेली मोटारसायकल क्र. एम.पी. 40 एम.एम- 5378 जिचा ENGINE NO-JC65E70267207

3)एक हिरो पेंशन प्रो ग्रे रंगाची मो. सा. क्र. सी. जी.04 एल.एस- 1209 जिचा ENGINE NO- HA10ACHΗΝ39553

4)एक सिल्व्हर रंगाची होन्डा एक्टीवा डुप्लीकेट मो. सा.क्र. एम.पी- 50 एस.ए- 3059 खरा क्र. एम.एच-40 बि.एन-442 जिचा ENGINE NO- JF50EU5397990, CHASSISS NO- ME4JF507GHU397905

5) एक होन्डा शाईन ग्रे  रंगाची लाल पटटा असलेली मो. सा. क्र. एम. एच- 49 एवाय- 5554 जिचा CHASSISS NO-ME4JC65ACJT033093

6)एक होन्डा पॅशन प्लस  निळ्या रंगाची मो. सा. क्र. एम. एच 40 सी- 4405 जिचा ENGINE NO-05A08M44242, CHASSISS NO- OSA09C4446

अशा एकूण 06 मोटार सायकली किंमती एकूण 2,80.000 /- रु चा मुद्देमाल* हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे

सदरच्या जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलपैकी 1 मोटारसायकल बुलेट गाडी ही पोलिस स्टेशन रामनगर दाखल गुन्हा क्र. 332/2023 कलम 379 भादंवि.चे गुन्ह्यातील असल्याने नमूद सराईत मोटार सायकल चोरट्यास जप्त करण्यात आलेल्या 06 मोटर सायकलीसह पोलिस ठाणे रामनगर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे अधिकचा तपास..पोलिय स्टेशन,रामनगर पोलिस करीत आहेत

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात पोलिस अंमलदार स.फौ. अर्जुन कावळे, पो. हवा.राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, घनश्याम कुंभलवार, संतोष केदार, यांनी कामगिरी बजावलेली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.