Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मराठा आंदोलकांबाबत धमकीची, अरेरावीची भाषा वापरणं योग्य नाही. मराठा समाजाचे ५८ मोर्चे आपण पाहिलेले आहेत. अंतरवाली सराटीत हिंसा करायची आवश्यकता नव्हती. तिथं लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती, कुणाच्या तरी आदेशानं ते घडलं का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
राजस्थानमध्ये आमचे दोन नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष सोडवण्यात आमचा वेळ गेला. इतर दोन राज्यातील नेते निवडून आले होते या विचारात होते, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. लोकसभेला या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. नेतृत्त्व बदल केला, केवळ तरुणांकडे सूत्रं दिली म्हणून सत्ता येते असं नाही, चुकांचं विश्लेषण करावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
भाजप विरोधात एकास एक उमेदवार देणार
२०१४ ला भाजपला कमळाच्या चिन्हावर ३१ टक्के मतं पडली होती. २०१९ ला त्यांना ३७ टक्के मतं पडली होती ती बालाकोटच्या मुद्यामुळं वाढली होती. महागाई, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीच्या मुद्यावर भाजपला पडणारी मतं कमी होतील, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. इंडिया आघाडीचा प्रयत्न एकास एक उमेदवार देऊन मतांची विभागणी टाळण्याचा प्रयत्न असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीला मतविभाजन टाळण्याचा इंडियाचा प्रयत्न आहे. ५४२ पैकी ४०० ते ४५० जागांवर उमेदवार एकास एक उभे केले तरी इतिहास घडेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. निवडणुकीत अंकगणित असतं त्यासाठी मतविभागणी टाळण्याचा प्रयत्न आहे. मोदींचा प्रयत्न मतविभागणी करण्याचा प्रयत्न असतो. गेल्या निवडणुकीत वंचितमुळं आघाडीचे ८ उमेदवार पडले, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी १५ लाख, २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं ते काय पूर्ण झालेलं नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. रस्त्यावरच्या लढाईत संविधान वाचवायचीय, लोकशाही वाचवायचीय यासाठी लढू असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पक्षांतर बंदी कुचकामी कायदा असून कचऱ्याच्या टोपलीत फेकण्याची गरज आहे आणि एक सोपा कायदा आणला पाहिजे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News