Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
याच पार्श्वभूमीवर, बलात्कार लेटरबॉम्बबाबत मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ”आठ महिलांनी पत्र लिहिले नसल्याचे पोलिसांनी म्हटले असून हे पत्र लिहिणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. तसेच, सदर प्रकरणी आम्ही सखोल माहिती घेतली असता तथाकथीत अर्जदारांकडे चौकशी केली असता सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कोणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापरे केल्याचे समजून आले आहे. सदरची माहिती ही पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचं समजून आलं आहे”.
दरम्यान, ”सदर अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे”, असं मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबईचे पोलिस आयुक्त, सर्व पोलिस सहआयुक्त यांच्या नावाने पोस्टाच्या माध्यमातून धाडण्यात आलेल्या पत्राची प्रत शुक्रवारपासून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली. हाहा म्हणता संपूर्ण पोलिस दलात ते प्रत्येकापर्यंत पोहोचले. मोटर परिवहन विभागातील आठ महिला कर्मचाऱ्यांची नावे आणि सह्या या पत्रावर आहेत. चालक म्हणून कार्यरत असलेल्या या महिला पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. धक्कादायक म्हणजे, ‘दोन पोलिस निरीक्षक आम्हाला सरकारी वाहनातून घरी घेऊन गेले आणि उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी आमच्यावर तेथे बलात्कार केला.
पती तसेच इतर कुटुंबीय गावी असल्याने आम्ही महिला मुंबईत एकट्याच राहत असून पोलिस दलाबाबतही फारशी माहिती नाही. याचाच गैरफायदा घेऊन हे अधिकारी आम्हाला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत. हे सर्व कायमचे थांबविण्यासाठी आम्ही उपायुक्तांची भेट घेतली. मात्र त्यांनी आम्हाला केबिनमधून हाकलून दिले’, असे या पत्रात म्हटले आहे. ‘आमच्यावरील अत्याचार इतक्यावर थांबले नाहीत, तर उपायुक्तांचे ऑपरेटर, ऑर्डली आणि चालकांनीही वेळोवेळी धमकावून अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच आमच्यावर बलात्कार केला’, असेही या पत्रात म्हटले आहे.