Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे दीडशेच्या जवळपास सिंचन प्रकल्प ओहरफ्लो झाले होते. यंदा मात्र जून महिन्यात सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र निम्मा पावसाळा कोरडा गेल्याने बीड जिल्ह्यात या वर्षी नद्यानाले भरून वाहिलेच नाहीत.
त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात पाणीसाठ्यात घट लक्षणीय आली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २१ प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ६० प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. त्याचप्रमाणे २७ प्रकल्पांत २५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. त्याचप्रमाणे १८ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणी आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक पाणी आहे, तर १४ तलावांत ७५ टक्क्यांहून अधिक साठा शिल्लक आहे.
तीन जिल्हे अवलंबून
जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पाची क्षमता ४५४ दशलक्ष घनमीटर असताना ३३९ दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा असून ते जिल्ह्यातील मांजरा व माजलगाव हे मोठे प्रकल्प तीन जिल्ह्यातील जनतेची तहान भागवतात.
या दोन मोठ्या प्रकल्पावरून बीड, अंबाजोगाई, केज, लातूर, कळंब, धारूर, केज, माजलगाव या मोठ्या शहरासह अनेक खेड्यांत पाणीपुरवठा होतो.
जिल्ह्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या मिळून १६६ सिंचन प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ९७५ दशलक्ष घनमीटर आहे. त्या तुलनेत सध्या उपयुक्त पाणीसाठा १४५ दशलक्ष घनमीटर तर मृतसाठा १९३ दशलक्ष घनमीटर शिल्लक आहे. आगामी काळात या जिल्ह्यातील एकशे चवेचाळीस सिंचन प्रकल्प तळाशी गेल्याने पाणी टंचाई भीषण होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.