Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ASUS ROG फोन ८ आणि फोन ८ प्रो चे स्पेसिफिकेशन
दोन्ही फोनमध्ये ६.७८-इंच (२४००×१०८० पिक्सल) फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १-१२०हर्ट्झ एलटीपीओ पॅनल आहे आणि गेमिंगसाठी मॅक्सिमम १६५हर्ट्झ रिफ्रेश रेट देतो. ही सॅमसंग ई६ अॅमोलेड स्क्रीन १०-बिट एचडीआर २०:९ अॅस्पेक्ट रेश्यो डिस्प्ले आणि २५०० निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. ह्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस २ ची सुरक्षा देण्यात आली आहे.
दोन्ही डिव्हाइसमध्ये अॅड्रिनो ७५० जीपीयूसह ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ ४एनएम मोबाइल प्लॅटफॉर्म आहे. तसेच, डिवाइस २४जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम १टीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेजसह आले आहेत. फोन्समध्ये ६५वॉट हायपर चार्ज फास्ट चार्जिंग, क्विक चार्ज ५.० आणि पीडी चार्जिंग, १५वॉट क्यूई वायरलेस चार्जिंगसह ५५००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
फोन्समध्ये १/१.५६″ सोनी आयएमएक्स८९० सेन्सर, एफ/१.९ अपर्चर, ६-अॅक्सिस गिम्बल स्टेबिलाइजेशन, १३एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ३२एमपी ३x टेलीफोटो सेन्सर, ओआयएस ५०एमपीचा रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२एमपीचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
ह्यात ३.५ मिमी ऑडियो जॅक, ड्युअल स्पिकर, ५-मॅग्नेट स्टीरियो स्पिकर, हेडफोन स्पॅशियल साउंडसाठी डायरेक्ट वर्चुओ, ASUS नॉइज रिडक्शन टेक्नॉलॉजीसह ट्राय-मायक्रोफोन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे. तसेच फोन्स ५जी, ४जी, वाय-फाय ७ ८०२.११ बीई, ब्लूटूथ ५.४, जीपीएस, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि आयपी ६८ रेटिंग आहे.
ASUS ROG फोन ८ आणि फोन ८ प्रो ची किंमत
आरओजी फोन ८ रिबेल ग्रे आणि फँटम ब्लॅक रंगात येतो आणि आरओजी फोन ८ प्रो व्हेरिएंट आणि प्रो फक्त फँटम ब्लॅक मध्ये येतो. आरओजी फोन ८ च्या १६ जीबी/२५६ जीबी मॉडेलची किंमत १०९९.९९ डॉलर (जवळपास ९१,३८० रुपये) आहे. तर फोन ८ प्रो च्या १६ जीबी/५१२ जीबी मॉडेलची किंमत ११९९.९९ डॉलर (जवळपास ९९,६८५ रुपये) आहे. आरओजी फोन प्रो व्हेरिएंटच्या २४जीबी/१टीबी मॉडेलची किंमत १४९९.९९ डॉलर (जवळपास १,२४,६१० रुपये) आहे.