Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयसीएआय सीए इंटर आणि फायनल, नोव्हेंबर २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर

9

CA Result 2024 : ICAI CA Inter & Final या नोव्हेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. खालील पायर्‍यांच्या मदतीने उमेदवारांना आपला निकाल तपासता येणार आहे. शिवाय, अधिकृत वेबसाइटवरील सक्रिय लिंकवरून उमेदवार त्यांची गुणपत्रिका (Marksheet) डाउनलोड करू शकतात.

INSTITUTE OF CHARTERED ACCOUNTANTS OF INDIA (ICAI) च्यावतीने या परीक्षेतील टॉपर्सची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाकणे आवश्यक आहे.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे घेण्यात आलेल्या सीए इंटर आणि सीए फायनल नोव्हेंबर २०२३ च्या परीक्षेस बसलेले उमेदवार त्यांचा निकाल आणि पेपरनिहाय गुण पाहून, ऑनलाइन मार्कशीट डाउनलोड करू शकतात.

असा बघा निकाल :
1. अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जा.
3. ICAI CA इंटर रिझल्ट २०२३ पोर्टलच्या होम पेजवर पॉप अपवर क्लिक करा.
4. ICAI CA अंतिम निकाल २०२३ चा निकाल पाहण्यासाठी, त्याच्या लिंकवर क्लिक करा.
4. तुम्हाला या होणाऱ्या नोव्हेंबर 2023 सीए फायनल / इंटर रिझल्ट 2024 लिंकवर क्लिक करावे लागेल.
4. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक अशी आवश्यक ती माहिती भरून ते सबमिट करा.
5. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
6. PDF मध्ये सेव्ह करून निकालाची प्रिंट आउट घ्या.

सीए निकाल २०२३ टॉपर्सची नावे :
सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर 2024 च्या निकालांच्या घोषणेबरोबरच, ICAI या परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची (टॉपर्स) यादी देखील प्रसिद्ध करेल. आयसीएआय शेवटच्या सत्राबद्दल म्हणजे मे २०२३ च्या परीक्षेमध्ये अहमदाबादच्या अक्षय रमेश जैन ८०० पैकी ६१६ गुण (७७ टक्के) गुण मिळवून अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. सोबतच, चेन्नईचा कल्पेश जैन ६०३ गुणांसह (७५.३८ टक्के) दुसरा तर नवी दिल्लीचा प्रखर वार्ष्णे ५७४ गुण मिळवून (७१.७५ टक्के) तिसरा आला.
ICAI CA Final Result 2023: सीए इंटरमिडिएट आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर; अहमदाबादचा अक्षय जैन देशातून पहिला
इंटरमिजिएट परीक्षेत हैदराबादच्या वाय गोकुळ साई श्रीकरने ८०० पैकी ६८८ गुण (८६ टक्के) गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. यानंतर, पतियाळा येथील नूर सिंगला ६८२ गुण (८५.२५ टक्के) गुणांसह द्वितीय तर मुंबईची काव्या संदीप कोठारी ६७८ गुणांसह (८४.७५ टक्के) तृतीय आली होती.

ICAI CA Inter & Final November 2024चा निकाल पाहण्यासाठी आणि अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.