Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपुर ग्रामीण पोलिस अधीक्षकाच्या विशेष पथकाने एकाच दिवशी अवैध रेती वाहतुकी विरोधात तीन धडाकेबाज कार्यवाहीत १ कोटीच्यावर मुद्देमाल जप्त…

7

पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे विशेष पथकाने अवैध रेती(वाळु) विरोधात केलेल्या ३ विविध कार्यवाहीत १ कोटी २७ लक्ष रु च्या मुद्देमालासह ९ आरोपी अटकेत तसेच ५ आरोपी फरार आहेत,विशेष म्हणजे यातील एका कार्यवाहीत एकाच नंबरचे दोन ट्रक बनावट रॅायल्टी काढुन वाळुची चोरटी वाहतुक करतांना आढळले तसेच यातील एक फरार आरोपी हा विविध गुन्ह्यांत पाहीजे आहे……

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे आदेशाने परीसरात अवैध धंदे रेडकामी खाजगी वाहनाने पोलिस ठाणे कन्हान हद्दीत गस्त करीत असतांना

पहीली कार्यवाही – दिनांक ७/१/२०२४ रोजी रात्री ११.४५ वा. सुमारास गोपनीय सुत्रधाराकडुन माहीती मिळाली की, काही १० चक्का टिप्पर गाड्या आमडी फाट्याकडुन कन्हान मार्ग नागपुर कडे अवैधरित्या विनापरवाना रेती (वाळु) टिप्परमध्ये लोड करून वाहतुक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून जबलपुर ते नागपुर मेन हायवे रोडवर टेकाडी शिवारात जिवो पेट्रोलपंप जवळ अवैध रेती वाहतुक सबंधाने अचानक नाकाबंदी करून संशयीत टिप्पर चेक करीत असता, एका एक संशयीत टिप्पर आमडी
फाटयाकडून नागपुरचे दिशेने येतांना दिसुन आले, त्यामध्ये रेती (वाळु) भरून असल्याचे दिसुन आले. सदरचे टिप्पर थांबविले, ज्यामध्ये चालक व त्यांचे साथीदार / क्लिनर आढळुन आले. सदर टिप्परमध्ये काय लोड आहेत? याबाबत विचारणा केली असता, त्यांनी वाळु रेती असल्याचे सांगीतले. तसेच सदर रेतीबाबत रॉयल्टी विचारली असता नसल्याचे सांगीतले. मिळून आलेल्या टिप्परमधील ईसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता, त्यांनी आपले नाव १) मनीराम सत्यवान जयतवार वय ५४ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ हनुमान मंदीर चौक गर्राबगेडा, ता. तुमसर, जिल्हा भंडारा, (एम.एच.
४० बि.एल. १२८३ चा चालक), २) विक्की मनोहर शेन्डे वय ३२ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ उमरवाडा, ता. तुमसर,जिल्हा – भंडारा, (एम.एच. ४० बि.एल. १२८३ चा क्लिनर), ३) लिखीराम बस्तीराम शेन्दरे वय ३९ वर्ष, रा. बिडगाव सिम्बोसिस कॅालेज जवळ आझाद नगर वाठोडा रोड, नागपुर, (एम.एच. ४९ बि.झेड. ९१६८ चा चालक), ४) रोशन
मुरलीधर मेश्राम वय २९ वर्ष, रा. वार्ड नं. २ सोनार मोहल्ला पिपरी, तह, पारशिवनी, जिल्हा नागपुर (एम.एच. ४०वाय ६६६१ चा चालक) असे सांगीतले. त्यांचे ताब्यातील टिप्पर वाहनाचा नंबर १) एम.एच. ४० बि.एल. १२८३, २)एम. एच. ४९ बि.झेड. ९१६८, ३) एम.एच. ४० बाय ६६६९ असा असुन सदर वाहनांची पाहणी केली असता, खालील मुद्येमाल मिळुन आलेला आहे. १) एक पांढऱ्या व निळया रंगाचे अशोक लेलॅन्ड कंपनीचे १० चक्का टिप्पर,
ज्याचा नंबर एम. एच. ४०/ वि.एल. १२८३ किंमती अंदाजे २४,००,००० /- रू. मध्ये २) अंदाजे ०६ (सहा) ब्रास रेती, प्रत्येकी ५०००/- प्रमाणे ३०,००० /- रू. ३) आरोपी नामे मनीराम सत्यवान जयतवार याचा एक टेक्नो स्पार्क कंपनीचा गो अॅन्ड्राईड जुना वापरता मोबाईल किंमती ०८,०००/- रू. चा. ४) आरोपी नामे मनीराम सत्यवान जयतवार याचे नगदी १०,६३० /- रुपये ५) आरोपी विक्की मनोहर शेन्डे याचा एक रेडमी नाझों ३० कंपनीचा अॅन्ड्राईड जुना वापरता मोबाईल किंमती १०,००० / – रू. ६) एक पांढऱ्या व निळया रंगाचे अशोक लेलॅन्ड कंपनीचे १२ चक्का
टिप्पर, ज्याचा नंबर एम. एच. ४९ बि.झेड. ९१६८ किं. २८,००,००० / – रू. मध्ये ७) अंदाजे ०९ ब्रास रेती, प्रत्येकी ५०००/- प्रमाणे ४५,०००/- रू. ८) आरोपी नामे लिखीराम बस्तीराम शेंन्दरे याचा एक ओप्पो ए १७ कंपनीचा अन्ड्राईड जुना वापरता मोबाईल किंमती १२,००० /-रू. ९) आरोपी नामे लिखीराम बस्तीराम बेन्दरे याचे
नगदी ५,४९० /- रूपये १०) एक पांढऱ्या व निळया रंगाचे टाटा कंपनीचे १० चक्का टिप्पर, ज्याचा नंबर एम. एच. ४० / वाय ६६६९ किंमती २५,००,०००/- रू. मध्ये ११) अंदाजे ०६ (सहा) ब्रास रेती, प्रत्येकी ५०००/- रू. प्रमाणे ३०,०००/- रू. १२) आरोपी नामे रोषन मुरलीधर मेश्राम याचा एक रिअलमी सि ३० एस कंपनीचा अन्ड्राईड जुना वापरता मोबाईल किंमती १०,०००/- रू. १३) आरोपी नामे रोशन मुरलीधर मेश्राम याचे नगदी ५,४६०/- रू. असा एकुण एकुण ७८,६६,५८०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुद्देमालाविषयी विचारणा केली असता, १) एम. एच. ४० बि.एल. १२८३ चा चालक मनीराम सत्यवान जयतवार आणि क्लिनर विक्की मनोहर शेन्डे हे असुन, गाडीमालक मंगेश तुलाराम राउत हे आहेत. तसेच २) एम.एच. ४९ वि.झेड. ९९६८ चा चालक लिखीराम बस्तीराम शेंन्दरे असुन, गाडी मालक अक्षय राजू घात, त्याचप्रमाणे ३) एम.एच. ४० वाय ६६६९ चा चालक रोशन मुरलीधर मेश्राम हा असुन, गाडीमालक राहुल तिवाडे हा असुन, सदर वाहनाचा ताबा मालक आकाष माहातो हे आहेत. गाडी मालकांच्या सांगणेप्रमाणे सदर रेती (वाळू) मैकेपार (मध्यप्रदेश) येथुन कन्हान मार्ग नागपुर येथे विनारॉयल्टी घेवून जात असल्याचे सांगीतले. आरोपीतांविरूद्ध ३७९, १०९ ३४ भादंवि सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसरी कार्यवाही  – दिनांक ०८/०१/२०२४ रोजी ०७.०० वा.सुमारास गोपनीय सुत्रधाराकडुन माहीती मिळाली की, १० चक्का टिप्पर गाडी आमडी फाटयाकडुन कन्हान मार्ग नागपूर कडे अवैधरित्या विनापरवाना रेती (वाळु) टिप्परमध्ये लोड करून वाहतुक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून तारसा फाटा कन्हान येथे अवैध रेती वाहतुक सबंधाने अचानक नाकाबंदी करून संशयीत टिप्पर चेक करीत असता, एक पिवळ्या रंगाचे संशयीत टिप्पर आमडी फाट्याकडुन नागपुरचे दिशेने येतांना दिसुन आले, त्यामध्ये रेती (वाळू) भरून असल्याचे दिसुन आल्याने, सदर टिप्पर थांबविले, ज्यामध्ये एक चालक व त्याचा साथीदार क्लिनर आढळुन आले. त्यांना सदर टिप्परमध्ये काय लोड आहेत? याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगीतले की, रेती आहे. सदर रेतीबाबत रॉयल्टी विचारली असता, नसल्याचे सांगीतले. मिळुन आलेल्या टिप्परमधील ईसमांना नाव व पत्ता विचारला असता, त्यांनी आपले नाव १) मोरेश्वर दशरथ गोंडाने वय ३३ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ पटेल नगर कन्हान तह. पारशिवनी, जिल्हा. नागपुर (एम. एच. ४० ए. के. ०२८३ चा चालक), २) रोहीत रामदासजी भोले वय २० वर्ष, रा. वार्ड क्र. १ कान्द्री, तह. पारशिवनी, जिल्हा. नागपुर (एम.एच. ४० / ए. के. -०२८३ चा क्लिनर) असे सांगितले. त्यांचे ताब्यातील टिप्पर
वाहनाचा नंबर एम. एच. ४९ बि.झेड. ९३५७ असा असुन, सदर वाहनाची पाहणी केली असता, खालील मुद्देमाल मिळुन आलेला आहे. १) एक पिवळया रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे १० चक्का टिप्पर क्र. एम. एच- ४० / ए. के.०८३ किंमती २४,००,००० / – रू. २) अंदाजे ०६ ब्रास रेती प्रत्येकी ३००० /-रू. ३०,००० /- रू. ३) आरोपी मोरेश्वर गोंडाणे याचा एक विवो १९०१ वाय अॅडरॉइड कंपनीचा जुना वापरता मोबाईल किंमती १२,००० /- रू. ४)
आरोपी रोहित रामदासजी भोलेय याचा एक रेडमी नोट ५ जी अँडरॉइड कंपनीचा जुना वापरता मोबाईल किंमती १०,०००/- रू. असा एकुण २४,५२,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील मुद्देमालाविषयी विचारणा केली असता, वर नमुद वाहन एक पिवळया रंगाचे अशोक लेलैड कंपनीचे १० चक्का टिप्पर, ज्याचा नंबर एम. एच. ४० / ए. के. ०२८३ चा मालक लोकेश वाहीले यांच्या मालकीचे असुन, त्याचे सांगणेप्रमाणे सदर रेती (वाळु) मैकेपार (मध्यप्रदेश) येथुन कन्हान मार्ग नागपुर येथे विनारॉयल्टी घेवुन जात असल्याचे सांगीतले. आरोपीतांविरूद्ध ३७९, १०९, ३४ भादंवि सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तिसरी कार्यवाही – दिनांक ०८/०१/२०२४ रोजी ०१.४५ वा. सुमारास गोपनीय सुत्रधाराकडुन माहीती मिळाली की, १० चक्का टिप्पर गाडी आमडी फाट्याकडुन कन्हान मार्ग नागपुरकडे अवैधरित्या विनापरवाना रेती (वाळु) टिप्परमध्ये लोड करून आणि बनावटी नंबर प्लेट लावुन वाहतुक करीत आहे. अशा खात्रीशीर
बातमीवरून जबलपुर ते नागपुर मेन हायवे रोडवर साई मंदीर जवळ अवैध रेती वाहतुक संबंधाने अचानक नाकाबंदी करून संशयीत टिप्पर चेक करीत असता, एक संशयीत टिप्पर आमडी फाट्याकडुन नागपुरचे दिशेने येतांना दिसुन आले, त्यामध्ये रेती (वाळु) भरून असल्याचे दिसुन आले. सदरचे टिप्पर थांबविले असता ज्यामध्ये फरार  आरोपी गाडी मालक नामे नरेश कृष्णाजी चवरे, वय ३३ वर्ष, रा. वार्ड क्र. २ कन्हान पिपरी, तह. पारशिवनी, जिल्हा. नागपुर
यांचे ताब्यातील मालकीचे टिप्पर वाहन एक पिवळया रंगाचे अशोक लेलॅन्ड कंपनीचे १० चक्का टिप्पर, ज्याचा नंबर एम.एच. ४०/बि. जी. १२६७ असा बनावटी नंबर दर्शवुन वाहतूक करतांना मिळुन आला परंतु सदर वाहनाचा वास्तवीक नंबर एम. एच. ३५ ए.जे. ०१३१ असा आहे. यातील ताबामालक नरेश कृश्णाजी चवरे यांनी १) भुषण देवीदास भुरे, वय २६ वर्ष, रा. कॅन्ट एरीया कामठी, (वास्तवीक वाहन नं. एम. एच. ३५ / ए. जे.- ०१३१ बनावटी
वाहन नं. एम. एच. ४० / वि.जी.- १२६७ चा चालक, २) अभिषेक दिलीप मेश्राम, वय २३ वर्ष, रा. कादर झेंडा जुनी खलासी लाईन कामठी, जिल्हा नागपुर, (वास्तवीक वाहन नं. एम. एच. ३५/ए.जे. ०१३१ बनावटी वाहन नं. एम. एच. ४० वि.जी. १२६७ चा क्लिनर) ३) वाहन मालक चंद्रशेखर फुंडे, रा. मरारटोली गोंदीया यांचे संगणमताने सदर वाहनाला बनावटी नंबर प्लेट लावुन शासनाची दिशाभुल करून फसवणुक केली. व त्याचप्रमाणे बनावटी नंबर
प्लेट लावलेल्या टिप्परमध्ये अवैधरित्या विनापरवाना रेती (वाळु) मैकेपार (मध्यप्रदेश) येथुन लोड करून व कन्हान मार्ग नागपुर येथे विना रॉयल्टी रेती लोड करून घेवुन वाहतुक करीत आढळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातून १) एक पिवळया रंगाचे अशोक लेलॅन्ड कंपनीचे १० चक्का टिप्पर, ज्याचा नंबर एम. एच. ४० बि.जी. १२६७ किंमती अंदाजे २४,००,००० /- रू.२) अंदाजे ०६ (सहा) ब्रास रेती, प्रत्येकी ५०००/- रू. प्रमाणे ३०,००० / – रू. ३) आरोपी नामे
– भुषण देवीदास भुरे याचा एक विवो वाय ३३ एस कंपनीचा अन्ड्राईड जुना वापरता १२,०००/- मोबाईल ४) आरोपी नामे नरेश कृष्णाजी चवरे याचा १५,०००/- रू. एक विवो व्ही २७ कंपनीचा अॅन्ड्राईड जुना वापरता मोबाईल. ५) आरोपी नामे – नरेश कृष्णाजी चवरे याचे नगदी १४,५८० /- रूपये असा एकुण २४,७१,५८० /-रूपयाचा मुद्येमाल मिळुन आला. आरोपीतांविरूद्ध पोस्टे कन्हान येथे कलम ४२० भांदवि., ३७९,१०९, ३४ सहकलम ४८(८) महारा जमिन महसुल संहिता १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या तिन्ही धडाकेबाज कार्यवाहीत एकुन १,२७,९०१६०/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ९ आरोपी यांना अटक करण्यात आली असुन ५ आरोपी फरार आहेत

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमित पांडे विशेष पोलिस पथक नागपूर ग्रामीण, पोलिस हवालदार ललीत उईके यांचे पथकाने पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.