Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त ११,९९९ रुपयांमध्ये 8GB RAM असलेला 5G Phone; लाँच होताच १००० रुपयांचा डिस्काउंटही

9

मोटरोलानं भारतात आपल्या 5G स्मार्टफोन प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढत नवीन बजेट फ्रेंडली ५जी फोन सादर केला आहे. बहुप्रतीक्षित Moto G34 5G स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आला आहे. ह्यात युजर्सना 8GB पर्यंत रॅम, 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, ६.५ इंचाचा मोठा डिस्प्ले, ५०००एमएएचची बॅटरी, ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरा असे अनेक फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊ मोटो जी३४ ५जी ची किंमत आणि फीचर्स.

Moto G34 5G चे स्पेसिफिकेशन्स

Moto G34 5G मध्ये ६.५ इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही पंच होल असलेली स्क्रीन १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर आधारित आहे. पावर बॅकअपसाठी ह्यात ५०००एमएएचची बॅटरी आणि १८वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे, ह्या किंमतीत हा जबरदस्त प्रोसेसर आहे. सोबतीला ८जीबी पर्यंत रॅम आणि १२८जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. तर ८जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीनं युजर्स १६जीबी पर्यंत रॅमची पावर वापरू शकतात.

कंपनीनं डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात ५० मेगापिक्सलचा क्वॉड पिक्सेल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स मिळतो.

Moto G34 5G मध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट, ड्युअल स्टीरियो स्पिकर, ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी पोर्ट, आयपी ५२ रेटिंग सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. Moto G34 5G मोबाइलमध्ये कंपनीनं एकूण १३ 5G बँडचा सपोर्ट दिला आहे. म्हणजे युजर्सना 5G वापरताना कोणतीही समस्या येणार नाही.

Moto G34 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीनं Moto G34 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. डिवाइसच्या ४जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोनचा ८जीबी रॅम व १२८जीबी मॉडेल फक्त ११,९९९ रुपयांमध्ये विकला जाईल.

लाँच ऑफर अंतगर्त कंपनी १,००० रुपयांचा एक्स्ट्रा एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. ह्या ऑफरनंतर फोनच्या बेस मॉडेलची किंमत ९,९९९ आणि टॉप व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये होईल. मोटो जी३४ ५जी चारकोल ब्लॅक आणि आइस ब्लूसह ओशन ग्रीन वेगन लेदर बॅक कलरमध्ये लाँच झाला आहे. ज्याची विक्री फ्लिपकार्ट, motorola.in आणि रिटेल आउटलेट्सवर १७ जानेवारी पासून सुरु होईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.