Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

८० अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता; पोलीस दलाकडून कार्यवाहीला सुरुवात, जाणून घ्या कारण

7

नाशिक: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पोलीस दलाने कार्यवाहीला सुरुवात केली असून, शहर पोलीस दलातील सुमारे ऐंशी अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता आहे. मूळ नाशिक जिल्ह्यात रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात सलग तीन वर्षे सेवा बजावत असल्याने त्यांची नियुक्ती दुसरीकडे करण्यात येईल. त्यासाठी राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे अधिकाऱ्यांना पसंतीक्रम मागविण्यात आला असून त्यानुसार ‘पोस्टिंग’ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
रेल्वेसंदर्भात मोठी बातमी, पुण्यातून सुटणाऱ्या महत्वाच्या गाड्या २५ दिवस रद्द
शहर पोलीस दलातील नाशिकरोड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांची काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस अकादमीत नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियमानुसार या स्वरूपाच्या बदलीचे वारे पोलीस दलात वाहत आहेत. त्यानुसार आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून उपनिरीक्षकांच्या बदलीसंदर्भात यादी तयार होत आहे. महासंचालक कार्यालय तसेच गृह विभागामार्फत लवकरच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने नाशिक शहरातील सुमारे दहा पोलीस निरीक्षकांच्या बदलीची शक्यता आहे.

त्यामध्ये पंचवटीचे अनिल शिंदे, म्हसरूळचे राजू पाचोरकर, नियंत्रण कक्षातील तुषार आढाव, इंदिरानगरचे नितीन पगार, नाशिकरोडचे पवन चौधरी, उपनगरचे विजय पगारे आणि बाबासाहेब दुकळे, आडगावचे गणेश न्याहदे, गंगापूरचे श्रीकांत निंबाळकर, सातपूरचे पंकज भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याने अकार्यकारी पदांवरील किंवा गुन्हे शाखेसह ‘साइड ब्रँच’चे अधिकारी या फेऱ्यात अद्याप नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील पोलिस ठाण्यांच्या ‘प्रभारी’ निरीक्षकांच्या जबाबदारीसह नियुक्तीत बदल होण्याची शक्यता आहे.

Kolhapur Mahalakshmi Ambabai Temple | दर्शन रांग थांबली; Aditya Thackeray म्हणाले, सत्कार बाहेर करा

किती बदल्या शक्य?
१० पोलीस निरीक्षक
२७ सहायक निरीक्षक
४३ उपनिरीक्षक

शहर पोलीस दलातील पाच-सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लवकरच सहायक आयुक्त अथवा उपविभागीय अधिकारीपदी पदोन्नती मिळणार आहे. निवडणुकीपूर्वी पदोन्नती जाहीर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांचीही बदली होईल. तर, उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षकही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी बदल्यांसह पदोन्नतीमुळे शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.