Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

8

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ‘सत्यशोधक’ हा मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांवर आला असताना त्याआधी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्यमंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय?

● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
(महिला व बालविकास)

● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी
(ग्राम विकास विभाग)

● शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
(वित्त विभाग)

शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा, आता शिवसेना आमदारांचंच भवितव्य ठरवणार, राहुल नार्वेकरांची कारकीर्द
● ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी
(वित्त विभाग )

● जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी
(दिव्यांग कल्याण विभाग)

महाराष्ट्राचा महाफैसला होणार, अपात्रतेची टांगती तलवार असणारे आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी
● पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता
(ग्राम विकास विभाग)

● महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार
(मदत व पुनर्वसन विभाग )

शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लान बी काय? कोण होणार मुख्यमंत्री? अशी असू शकतात समीकरणं
● राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी
(अन्न व नागरी पुरवठा)

● राज्यात न्यायिक
अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि ११०६४ सहाय्यभूत पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी
(विधी व न्याय विभाग)

जो गट पात्र ठरेल तिथे आमदारांची संख्याही वाढेल, आमदार अपात्रतेवर अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.