Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जोरदार प्रमोशन, पण कमाई मात्र नाहीच; माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’नं पाच दिवसात कमावले फक्त…

11

मुंबई: धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ अलीकडेच प्रदर्शित झाला. राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ सिनेमाला प्रेक्षकांकडून पहिल्या दोन दिवसांत उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. पण नंतर मात्र सिनेमाची कमाई थंडावली आहे.काही सिनेमागृहात ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत असले तरी बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे मात्र निराशा करणारे आहेत.
मुक्ताच्या रागाचा भडका उडाला! थेट सागरलाच सांगितलं- ‘माझ्या मुलीला हात जरी लावला ना तर…’
जोरदार प्रमोशन, कमाई मात्र नाहीच
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुणे, ठाणे, दादरमधील काही चित्रपटगृहांना माधुरी दीक्षितनं भेट दिली. अनेक ठिकाणी ‘माधुरी, माधुरी’ असा आवाज करत तिचं जल्लोषात स्वागत केलं. काहींनी तर तिला उखाणा घेण्याची विनंतीही केली. माधुरीनंसुद्धा तिच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. यावेळी चित्रपटाच्या टीमनं प्रेक्षकांसोबत संवाद साधला. तसंच टीमनं प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाण्याचा आनंदही लुटला. प्रेक्षकांनी सिनेमातील आवडलेल्या काही प्रसंगावर चर्चा केली. अभिनेता आदिनाथ कोठारे यानं यावेळी हा हाऊसफुल्ल सेल्फी घेत आनंद व्यक्त केला. पण हे प्रमोशन कमाईच्या आकड्यांमध्ये उतरलं नसल्याचं पाहायला मिळतंय.

कमाई किती?
प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी सिनेमानं २५ लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं २८ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी कमाईत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं. तिसऱ्या दिवसाची कमाई ही ३० लाख होती. तर चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घसरण झाल्याचं दिसून आलं. चौथ्या दिवशी सिनेमानं फक्त २० कोटी कमवले. सिनेमानं आतापर्यंत फक्त १.३० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.
सासऱ्यांचा आईला फोन, दिवंगत वडिलांबद्दल नको ते बोलले; सासूवर भडकली अंकिता लोखंडे
बजेट किती?
माधुरी दीक्षितनं सिनेमाची निर्मिती केली असल्यानं बजेट देखील चर्चेचा विषय ठरलं होतं. सिनेमाचं बजेट तीन कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे.

तगडी स्टारकास्ट
सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर, आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.