Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- लिसियस कंपनीला मच्छीमार कृती समितीचा दणका
- ऑनलाइन मासेविक्रीच्या ‘या’ जाहिरातीवर घेतला आक्षेप
- जाहिरात बंद न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
मुंबई: ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’ अशी जाहिरात करत ऑनलाइन मासे विक्री करणाऱ्या ‘लिसियस’ कंपनीला अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीनं जोरदार दणका दिला आहे. कृती समितीनं कंपनीला थेट कायदेशीर नोटीस धाडली असून ही जाहिरात तात्काळ बंद करा, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील मासळी बाजारांवर कारवाई केली जात आहे. क्रॉफर्ड मार्केटनंतर दादरमधील मासळी बाजारही मुंबईबाहेर हलवण्यात आला आहे. टॉवरमध्ये राहणाऱ्या मुंबईतील श्रीमंतांना माशांचा वास आवडत नसल्यानं आमच्यावर कारवाई केली जात असल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे. ‘लिसियस’ कंपनीच्या जाहिरातीमुळं मच्छीमारांचा हा आरोप एक प्रकारे खरा ठरला आहे. बाजारातील माशांना वास येत असल्याचा उघडउघड प्रचार लिसीयसनं सुरू केला आहे. त्याविरोधात मच्छिमारांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे.
कृती समितीनं ‘मटा’ला पाठवलेला जाहिरातीचा व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=RhMrRr0ok-M
वाचा: धक्कादायक! टीव्हीची केबल जोडताना शॉक लागून गोळाफेकपटूचा मृत्यू
कृती समितीच्या महिला अध्यक्ष नयना पाटील यांनी ही जाहिरात हटवण्याची मागणी कंपनीकडं केली आहे. मासेमारी आणि मासेविक्री हा कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आजवर ही मासळी बाजारात विकली जात असताना त्याचा वास कधी आला नाही. ऑनलाइन मासे विक्री करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्यापासून बाजारातील मासळीला बदनाम केलं जात आहे. यामध्ये कोळी समाज आणि कोळी महिलांची बदनामी होत असून हे आम्ही सहन करणार नाही. अब्रू नुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वाचा: तुमचं नाव सुशील किंवा सुशीलकुमार असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे!
आधी मार्केटवर कारवाई, आता ऑनलाइन मासे विक्री आणि त्यातून होणारी बदनामी हे एक प्रकारे कोळी महिलांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान आहे, असा आरोप नयना पाटील यांनी केला आहे. सरकारनं तात्काळ दखल घेऊन ऑनलाइन मासे विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वाचा: स्वत:ला कोकणसम्राट म्हणवून घेणाऱ्या नारायण राणेंना…; सुभाष देसाईंची बोचरी टीका