Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भारतातून दरवर्षी दोन लाखांहून अधिक पर्यटक मालदीवला जातात. त्यातील मुंबईतील पर्यटकांचा आकडा जवळपास मासिक १२०० ते १५०० आहे. सद्य:स्थितीत भारतीय पर्यटकांनी दहा हजारहून अधिक हॉटेल बुकिंग आणि ५ हजारहून अधिक विमान तिकिटे मालदीवची राजधानी माले विमानतळासाठी काढली आहेत. हे सर्व बुकिंग रद्द होण्याच्या वाटेवर आहे. या स्थितीत ‘केसरी टूर्स’ या आघाडीच्या पर्यटन व्यवस्थापन कंपनीनेही देशहितार्थ महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
याबाबत कंपनीच्या संचालक झेलम चौबळ यांनी सांगितले की, ‘मालदीव हा भारताचा जुना मित्र असून, पर्यटनाच्या बाबतीत हा देश बव्हंशी भारतावर अवलंबून आहे. मात्र, त्यांनी राष्ट्र म्हणून भारताचा आणि आपल्या पंतप्रधानांचा केलेला अपमान कदापि सहन करणार नाही. एक वर्ष मालदीवच्या पर्यटनाला न गेल्याने भारतीय पर्यटकांना काहीही फरक पडणार नाही. येथील पर्यटक आणि आम्हा भारतीयांसाठी अख्खे जग खुले आहे. पण, मालदीवसाठी भारत महत्त्वाचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. मालदीवच्या सहली रद्द करण्यात आल्या आहेत.’
देशहितार्थ व राष्ट्रसन्मानाचा विचार करून ‘केसरी टूर्स’ने याआधी कॅनडाच्या सहली रद्द केल्या होत्या. कॅनडा सरकारने भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचा अपमान भारतीय कधीच सहन करणार नाहीत. त्यामुळेच भारतीय पर्यटकांच्या भावनेचा आदर करून आम्ही चालू मोसमातील मालदीवच्या सर्व सहली रद्द केल्या आहेत.
-झेलम चौबळ, संचालक, केसरी टूर्स