Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुख्य परीक्षा ५ डिसेंबर २०२३ रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. प्राथमिक परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी होती.
अशी असणार निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात
(i) सायकोमेट्रिक चाचणी (Psychometric Test)
(ii) गट चर्चा (Group Discussion)
(iii) मुलाखत (Interview) समाविष्ट आहे.
सायकोमेट्रिक चाचणी: तिसऱ्या टप्प्यात निवडलेल्या उमेदवारांची व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी एसबीआयच्यावतीने सायकोमेट्रिक चाचणी घेतली जाणार आहे. परीक्षेचे निकाल सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी मुलाखत पॅनेलला सादर केले जातील.
उमेदवारांनी फेज II आणि फेज III दोन्ही पास होणेआवश्यक आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मुख्य परीक्षेचे (टप्पा-II) गुण, वस्तुनिष्ठ चाचणी आणि वर्णनात्मक चाचणी या दोन्ही टप्प्यांच्या गुणांसह एकत्रित ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय, निवडीसाठी अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्राथमिक परीक्षेचे (टप्पा-I) गुण विचारात घेतले जाणार नाहीत.
टीप: फेज-II (मुख्य परीक्षा दोन्ही वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक चाचणी) आणि फेज-III (ग्रुप एक्सारसाइज आणि मुलाखत) मधील उमेदवारांनी मिळवलेले गुण खाली दिलेल्या तपशिलानुसार १०० गुणांपर्यंत नॉर्मलाइज केले जातील.
रिक्त पदांचा तपशील :
रिक्त पदांबद्दल बोलायचे झाल्यास, SC प्रवर्गासाठी ३०० पदे, ST प्रवर्गासाठी १५० पदे, OBC प्रवर्गासाठी ५४० पदे, EWS वर्गासाठी २०० पदे, सामान्य श्रेणीसाठी ८१० पदे आणि अशा प्रकारे एकूण २००० पदांवर भरती केली जाईल.