Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जिओचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
जिओचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आणि ह्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, डेली १०० एसएमएस आणि डेली ३जीबी डेटा मिळतो. तसेच ३९९ रुपयांच्या प्लॅनसह, जिओ ६१ रुपयांचा डेटा मोफत देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना ६जीबी बोनस डेटा मिळत आहे. म्हणजे संपूर्ण वैधतेसाठी ग्राहकांना एकूण ९०जीबी डेटा मिळेल. जर तुम्ही जिओच्या डेटा बूस्टर सेक्शनमध्ये गेलात तर तुम्हाला ६१ रुपयांचा प्लॅन ६जीबी डेटासह दिसेल. प्लॅनसह मिळणाऱ्या अॅडिशनल बेनिफिट्समध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचा समावेश आहे. हा प्लॅन ग्राहक जिओच्या Unlimited 5G Data ऑफरसाठी देखील पात्र आहे.
जिओचा २१९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
जिओचा २१९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन १४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. ह्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह डेली ३जीबी डेटा आणि डेली १०० एसएमएस मिळतात. २१९ रुपयांच्या प्लॅनसह, जिओ २५ रुपयांचा डेटा मोफत देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना २जीबी बोनस डेटा मिळतो. म्हणजे संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान ग्राहकांना एकूण ४४जीबी डेटा मिळेल. जिओच्या डेटा बूस्टर सेक्शनमध्ये २५ रुपयांचा प्लॅन २जीबी डेटासह लिस्ट करण्यात आलेला आहे. ह्या प्लॅनसह जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचे अॅडिशनल बेनिफिट दिले जात आहेत. ह्या प्लॅनदेखील जिओच्या Unlimited 5G Data ऑफरसाठी एलिजिबल आहे.
सध्या जिओ ह्या ये दोन प्रीपेड प्लॅन सोबत बोनस डेटा देत आहे. तसेच, जर तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटाचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्या परिसरात 5G कव्हरेज असणं आणि तुमच्याकडे 5G फोन असणं आवश्यक आहे.